LIVE BLOG | मुंबई : कोस्टल रोडसाठी मच्छिमारांची जागा सरकार घेणार नाही, मुख्यमंत्र्यांची घोषणा

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Jun 2019 11:38 PM
रायगड : अलिबाग येथे एका बंगल्यावर पोलिसांचा छापा टाकून सेक्स व ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश, पाच महिलांसह 9 जणांना अटक, सात मुलींची सुटका, मुलींची सुधारगृहात रवानगी, छाप्यात अंदाजे अडीच लाख किमतीचं 26 ग्रॅम कोकेन जप्त
कल्याण : अंबरनाथमध्ये रिक्षा स्टँडवर झाड कोसळून एका रिक्षाचालकाचा मृत्यू, तर दोन रिक्षाचालक जखमी, अंबरनाथ पूर्वेच्या शिवाजी चौकातली घटना
मुंबई-पुणे हायपरलूप पुलच्या 15 किमी लांबीच्या प्रायोगिक टप्प्याचं प्रकल्पाचं लवकरच भूमिपूजन, मुंबई-पुणे अर्धा तासात प्रवास शक्य होईल : मुख्यमंत्री
डॉ. आंबेडकरांचे स्मारक 2020 च्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत पूर्ण करु, मुख्यमंत्र्यांची माहिती
मुंबई : कोस्टल रोडमुळे कुठलेही कोळीवाडे बाधित होणार नाही, मच्छिमारांची जागा कोस्टल रोडसाठी सरकार घेणार नाही, मुख्यमंत्र्यांची घोषणा
मेट्रो, मोनो, लोकल ट्रेन, बसेस अशा सर्व दळवळणाच्या साधनांना सिंगल तिकिटावर आणण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून एमएमआरडीएची नेमणूक करणार - मुख्यमंत्री

अकोला : बाळापूर तालुक्यातील बोरवाकळी येथे शेतात वीज पडून दोन शेतमजुरांचा मृत्यू, बाळु नारायण उमाळे (55) आणि दीपक शेगोकार (15) अशी मृतांची नावे

अकोला : बाळापूर तालुक्यातील बोरवाकळी येथे शेतात वीज पडून दोन शेतमजुरांचा मृत्यू, बाळु नारायण उमाळे (55) आणि दीपक शेगोकार (15) अशी मृतांची नावे
पुणे : जामरुंग रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे इंजिन रुळावरुन घसरलं, मुंबईवरुन पुण्याकडे येणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, नागरकॉईल एक्स्प्रेस कर्जत स्थानकात रखडली
मुंबई : अभिजीत बिचकुलेचा जामीन न्यायालयाने फेटाळला, बिचकुलेचा बिग बॉसमध्ये परतीचा मार्ग बंद, मुंबईतून तो परत येण्याची शक्यता कमी असल्याने जामीन फेटाळला
मुंबई : दादारमधील मीनाताई ठाकरे फूल मार्केटजवळ भिंत पडली, तीन जण जखमी
मुंबई: मुंबईच्या पहिल्याच पावसात शॉक लागून तीन जणांचा मृत्यू, अंधेरीमध्ये एकाचा मूत्यू , तर गोरेगावमधील दोघांचा समावेश
मराठा आरक्षणाची खिंड न्यायालयात लढवणाऱ्या विनोद पाटील यांच्या घरावरील रोषणाई



रत्नागिरी : आंबेनळी घाटात ट्रकचा भीषण अपघात,
चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने एक ट्रक सुमारे 800 फुट खोल दरीत कोसळला,
मदतीसाठी ट्रेकर्स घटनास्थळाकडे रवाना
मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात, अंधेरी, बोरीवली, पवई, घाटकोपरमध्ये मुसळधार पाऊस, तर वसई, पालघरमध्येही मुसळधार
पुणे : फातीमानगरला क्रोम मॉल चौकात अपघात, पालखी बंदोबस्त लावण्यासाठी निघालेल्या लष्कर पोलीस स्टेशनचे मिलींद मकासरे यांच्या डोक्यावरुन गेले अज्ञात वाहनाचे चाक, अपघातात मिलींद मकासरे यांचा जागीच मृत्यू

पार्श्वभूमी

 




    1. मुंबई उच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब, आरक्षण वैध असल्याचा निर्वाळा, शिक्षण क्षेत्रात १२ तर नोकऱ्यांत १३ टक्के आरक्षण



 




    1. जी 20 परिषदेत मोदी आणि ट्रम्प यांची भेट, अमेरिकन उत्पादनावरील वाढीव आयात शुल्कासह अनेक मुद्द्यांवर चर्चा



 




    1. कल्याण, भिवंडी बदलापूरमध्ये जोरदार पाऊस, नाशकातही दमदार हजेरी, रामटेकमध्ये शाळेवर वीज पडल्यानं 8 विद्यार्थी जखमी



 




    1. दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी एका महिन्यात लागू होणार, पर्यावरणमंत्री रामदास कदमांची विधानसभेत माहिती, प्लास्टिक बंदीसाठी मोठा निर्णय



 




    1. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडला, आज दिवेघाटाची अवघड चढण तर तुकोबांची पालखी लोणी काळभोरला मुक्कामी



 




    1. मॅन्चेस्टरमध्ये टीम इंडियाकडून विंडीजचा १२५ धावांनी धुव्वा, मोहम्मद शमीसह भारतीय आक्रमण प्रभावी, यंदाच्या  विश्वचषकातला टीम इंडियाचा सलग पाचवा विजय



 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.