LIVE BLOG | विश्वचषकातील पाकिस्तान वि. श्रीलंका सामना पावसामुळे रद्द
पाकिस्तान आणि श्रीलंका संघांमधला विश्वचषकाचा साखळी सामना आज पावसामुळे रद्द करावा लागला. यंदाच्या विश्वचषकात पावसामुळे रद्द झालेला हा पहिलाच सामना आहे. ब्रिस्टलमधल्या या सामन्यात एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे दोन्ही संघांना एकेक गुण बहाल करण्यात आला. इंग्लंडच्या वेळेनुसार दुपारी पावणेचारच्या सुमारास पंचांनी खेळपट्टी ओलं असल्याचं कारण सामना रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघांच्या खात्यात तीन सामन्यांत एक विजय, एक हार आणि एक रद्द सामना या कामगिरीचे तीन गुण झाले आहेत.
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
07 Jun 2019 11:36 PM
एम. पी. मिल कंपाऊंड प्रकरणी लोकयुक्तांनी अहवाल शासनाकडे सोपवल्यानंतर प्रकाश मेहता यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा, कोअर कमिटी बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होणार असल्याने मेहतांची उपस्थिती लक्षवेधी, बैठकीत चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजनही उपस्थित
पाकिस्तान आणि श्रीलंका संघांमधला विश्वचषकाचा सामना पावसामुळे रद्द, ब्रिस्टलमधील सामन्यात एकाही चेंडूचा खेळ होऊ न शकल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण, दोन्ही संघांच्या खात्यात तीन सामन्यांत एक विजय, एक हार आणि एक रद्द सामना या कामगिरीचे तीन गुण जमा
धोनीला पुढच्या सामन्यांमध्ये बॅज वापरण्यास मनाई, बीसीसीआयचं अपिल आयसीसीने फेटाळलं, बॅज नसलेले ग्लोव्ह्ज वापरण्याची सक्ती
नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, 'वर्षा' निवासस्थानी सुमारे अर्धा तास राणेंची देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा
औरंगाबाद : सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात उद्या वाघांच्या बछड्याचा नामकरण सोहळा, सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत खैरे यांना निमंत्रण, खासदार असूनही मुद्दाम पत्रिकेत नाव छापलं नाही, एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांचा आक्षेप
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. काँग्रेसने घेतलेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या विरोधात सूर आळवला आहे. आघाडी झाली तरी राष्ट्रवादी मतदारसंघात काँग्रेसला मदत न करता भाजपला मदत करते. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत आघाडी नको, त्याऐवजी वंचित बहुजनसोबत आघाडी करावी, असा सूर बैठकीत उमटला.
आंध्र प्रदेशात सत्तेचा नवा पॅटर्न, एक मुख्यमंत्री तर देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पाच उपमुख्यमंत्र्यांची निवड
आंध्र प्रदेशात सत्तेचा नवा पॅटर्न, एक मुख्यमंत्री तर देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पाच उपमुख्यमंत्र्यांची निवड
मुंबई : चंद्रकांत दादा पाटील पुण्याचे नवे पालकमंत्री, तर जळगावचं पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांच्याकडे, अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय जय कुमार रावल यांच्याकडे आणि विनोद तावडे संसदीय कामकाज मंत्री : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
खरीपाच्या नियोजनासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद लाईव्ह,
यंदा पर्जन्यमान बरे असेल : फडणवीस
खरीपाच्या नियोजनासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद लाईव्ह,
यंदा पर्जन्यमान बरे असेल : फडणवीस
पुणे: पुणे-नाशिक महामार्गावर वाहनाच्या धडकेने बिबट्याचा अपघातात मृत्यू, काल रात्री जुन्नरच्या नारायणगाव येथे ही घटना घडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मानहानी खटल्यात कॉंग्रेस नेते शशी थरूर यांना दिल्ली कोर्टाकडून जामीन मंजूर
गोवा : काँग्रेसचे चार आमदार भाजपच्या वाटेवर, कुंकळ्ळीच्या काँग्रेस आमदार क्लाफासियो डायस यांचा गौप्यस्फोट
जम्मू काश्मीरच्या पुलवामा परिसरात सुरक्षाबलाच्या जवानांकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान, एके श्रेणीतल्या तीन रायफल जप्त, पुलवामा परिसरात सर्च ऑपरेशन जारी
पार्श्वभूमी
1. रेपो रेटमध्ये कपात केल्याने कर्ज स्वस्त होणार, आरटीजीएस आणि एनईएफटी पेमेंटसाठी लागणारे शुल्कही रद्द, आरबीआयचा दुहेरी दिलासा
2. पुणे म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत, साडेचार हजारांपेक्षा जास्त सदनिकांसाठी सोडत, सकाळी 10 वाजता लाईव्ह प्रक्षेपण
3. विखेंना मंत्रीमंडळात एन्ट्री मिळावी यासाठी प्रकाश मेहतांची खूर्ची धोक्यात, राजकीय वर्तुळात कुजबुज, आज भाजपच्या राज्य कोअर कमिटीची बैठक
4. घरकुल घोटाळाप्रकरणी आज धुळे न्यायालयाचा निकाल येणार, 45 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी 93 संशयितांवर गुन्हा, सुरेश जैन, गुलाबराव देवकरांचे भविष्य टांगणीला
5. 2023 नंतर दुचाकी तर 2026 नंतर चारचाकी वाहनं इलेक्ट्रिक करण्याचा सरकारचा विचार, वायू प्रदुषण रोखण्यासाठी निती आयोगाचा प्रस्ताव
6. धोनीला ग्लोव्हजवरचा बलिदान बॅज काढायला सांगण्याची आयसीसीची बीसीसीआयला विनंती, सेनादलाचा बॅज वापरणं नियमात न बसणारे, आयसीसीचा खुलासा
7. सलमान खानच्या 'भारत'ची पहिल्याच दिवशी मोठी कमाई, 42 कोटी 30 लाखांचा गल्ला, स्वतःच्याच सिनेमाचे रेकॉर्ड सलमानने मोडले