Climate Change : शहरीकरण आणि बदलती जीवनशैली यामुळे अनेक दशकांपासून आपण पर्यावरण आणि जागतिक तापमानवाढ (Temperature) याकडे दुर्लक्ष केल आहे. पण आता हे मुद्दे चर्चेचा आणि चिंतेचा विषय झालेत. नागरिक या विषयाकडे गांभीर्याने बघायला लागलेत. 'येल प्रोग्राम ऑन क्लायमेट चेंज कम्युनिकेशन' आणि 'CVoter इंटरनॅशनलच्या ग्लोबल वॉर्मिंग्ज 4 इंडियाज, 2022’ यांच्या अहवालानुसार 82 टक्के भारतीय ग्लोबल वॉर्मिंगबद्दल (Global Warming) "चिंताग्रस्त" असल्याचं समोर आलं आहे.
ग्लोबल वॉर्मिंगमुळे 82 टक्के भारतीय चिंतेत असल्याचं तर उर्वरित 18 टक्के या समस्यांबाबत निष्क्रिय असल्याचं नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालातून समोर आलं आहे. या अहवालासाठी ऑक्टोबर 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीत 4,619 भारतीयांशी टेलिफोनिक इंटरव्ह्यू करण्यात आले. संपर्क केलेल्या लोकांपैकी 82 टक्के भारतीय हवामान बदलाविषयी चिंतित आहेत.
काय आहे आकडेवारी?
अहवालानुसार, 54 टक्के भारतीय चिंताग्रस्त असून या लोकांना खात्री आहे की जागतिक तापमानवाढीमुळे मोठे नुकसान होऊ शकते. तर 29 टक्के लोकं चिंताकूल असून हा महत्वाचा मुद्दा असला तरी त्याबद्दल फारशी माहिती नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर 11 टक्के लोकांना हा मुद्दा माहित असून त्याचे परिणाम लगेच होणार नाहीत असे वाटत आहे. 7 टक्के लोकांनी या विषयावर विचारच केलेला नाही.
'काही गोष्टी या स्थानिक लोक अन् सरकारच्या हातात सोपवाव्या लागतात'
माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी यावर बोलताना म्हटले की, 'या स्थानिक लोक अन् सरकारच्या हातात सोपवाव्या लागतात. नागरिकांमध्ये ग्लोबल वॉर्मिंगची जागरूकता निर्माण करणे, उभारले जात असलेले प्रकल्प पर्यावरणावर कसा परिणाम करणार आहेत, विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास न होऊ देणं यासाठी सरकारने क्लायमेट चेंजसाठी एक ऍक्शन प्लॅन बनवणे गरजेचं आहे'.
तसेच यावर तज्ज्ञांनी देखील आपले मत नोंदवले आहे. मयुरेश प्रभुणे यांनी म्हटले की, 'हे चिंताग्रस्त भारतीय वैयक्तिक पातळीवर जागतिक तापमान रोखण्यासाठी प्रयत्न करायला करायला असून ते हवामान धोरणांचे समर्थन करतात आणि त्यांना सरकारांकडून देखील नेतृत्वाची अपेक्षा आहे. मात्र उर्वरित लोकांचं काय? यासाठी ग्लोबल वॉर्मिंगची करणे आणि परिणाम समजून घेऊया.'
परंतु नागरिकांनी यावर प्रतिक्रिया देत 'जागतिक पातळीवर होणारी तापमानवाढ आणि वातावरणातील बदल थांबवणं सोपं नसलं तरी यासाठी सर्वसामान्य माणूस स्थानिक पातळीवर बऱ्याच गोष्टी करून एक योगदान देऊ शकतो' असं म्हटलं आहे.
आपला महाराष्ट्र, भारत, ही संस्कृती आपल्याला जुन्या पिढीकडून मिळाली आहे. पुढच्या पिढीला जर आपल्याला आपला देश चांगल्या, राहण्याजोग्या अवस्थेत द्यायचा असेल तर त्यासाठी पर्यावरणाचे मुद्दे गांभीर्याने घेणं महत्वाचं आहे. फक्त होणारे प्रकल्प नाही तर ग्लोबल वॉर्मिंग सारखे मुद्द्यांवर आपण गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. नाहीतर त्याचे परिणाम पुढच्या पिढीवर होऊ शकतील. त्यामुळे फक्त सरकार नाही तर वैयक्तिक पातळीवर देखील काम करणं गरजेचं आहे.