UPSC Geo Scientist 2023 : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) जिओ सायंटिस्टच्या भरतीसाठी (Geo Scientist Recruitment)अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यावर्षी या परीक्षेद्वारे एकूण 285 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in वर जाऊन अर्ज भरावा लागेल. यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वेबसाइटला भेट देऊन अधिसूचना म्हणजेच नोटिफिकेशन तपासण्याचा सल्ला दिला जातो.


जिओ सायंटिस्ट भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू


UPSC ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, कालपासून म्हणजेच 21 सप्टेंबर 2022 पासून जिओ सायंटिस्ट भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 11 ऑक्टोबर 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्ज कसा भरायचा ते तुम्ही पाहू शकता.


UPSC Geo Scientist 2023: अर्ज प्रक्रिया
अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट- upsconline.nic.in वर जावे.
त्यानंतर उमेदवार “वन-टाइम रजिस्ट्रेशन (ओटीआर)” अशा लिंकवर क्लिक करा
यानंतर, Exam Notification च्या लिंकवर जावे: Combined Geo-Scientist (Preliminary) Examination, 2023.
आता Click Here to Apply या पर्यायावर जा.
पुढील पानावर विचारलेले तपशील भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
तुम्ही नोंदणी क्रमांकाद्वारे अर्ज भरू शकता.
अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याची प्रिंट काढा.


'या' पदांसाठी जागा रिक्त


यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2022 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. या भरती मोहिमेद्वारे भूवैज्ञानिक, भूभौतिकशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक 'बी' पदांसह विविध पदांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे एकूण 285 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.



अर्ज फी आणि रिक्त जागा तपशील


अर्ज फी म्हणून, सामान्य श्रेणी आणि ओबीसी उमेदवारांकडून 200 रुपये जमा केले जात आहेत, तर SC, ST आणि PH श्रेणीतील अर्ज शुल्क आकारले जात नाही. याशिवाय भूगर्भशास्त्रज्ञ गट अ च्या एकूण 216 पदांची भरती करण्यात येणार आहे, त्याशिवाय भूभौतिकशास्त्रज्ञ गट अ च्या 21 पदे, रसायनशास्त्रज्ञ 19 पदे आणि शास्त्रज्ञ बी च्या 29 पदांची भरती करण्यात येणार आहे. अधिक तपशीलांसाठी अधिकृत अधिसूचना तपासावी.


संबंधित बातम्या


UPSC Exam 2022 : UPSC कडून वन टाईम रजिस्ट्रेशन प्लॅटफॉर्म लॉन्च; फायदे काय?


MPSCचा मोठा निर्णय! उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठीच्या पर्यायामध्ये सुधारणा


 


 


 


 


 


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI