UPSC Exam 2022 : संघ लोक सेवा आयोगाने (UPSC) भरती परीक्षांसाठी वन टाईम रजिस्ट्रेशन (OTR) प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. जारी करण्यात आलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, OTR च्या मदतीनं नोंदणी फक्त एकदाच करावी लागेल. UPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही परीक्षेसाठी पुन्हा तपशील भरण्याची गरज भासणार नाही. नोंदणी पूर्ण झाल्यावर, ती आयोगाच्या सर्व्हरमध्ये नंतर वापरण्यासाठी सेव्ह केली जाईल. यामुळे वेळेची बचत होईल आणि अर्ज प्रक्रिया सुलभ होईल, असं बुधवारी एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आयोगाच्या सर्व्हरवर माहिती सेव्ह केली जाईल.
24 तासांसाठी उपलब्ध असणार सुविधा
OTR उमेदवारांसाठी वन टाइम रजिस्ट्रेशन प्लॅटफॉर्म अत्यंत उपयुक्त ठरेल. आयोगाच्या वेबसाइटवर 24 तास उपलब्ध असेल. ऑनलाइन अर्ज करताना, 70 टक्के माहिती आपोआप रेकॉर्ड केली जाईल.
यूपीएससी वन-टाइम रिजस्ट्रेशन फॉर्म कसा भरावा?
- सर्वात आधी यूपीएससीची (UPSC Exams) अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर लॉगइन करा.
- होम पेजवर युपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी वन-टाइम रिजस्ट्रेशन असं लिहिलेल्या आयकॉनवर क्लिक करा.
- नाव, लिंग, जन्म तारीख, ईमेल आयडी, ओटीपी, पासवर्ड आणि व्हेरिफिकेशन कोड सारख्या रजिस्ट्रेशन डिटेल्स भरा.
- त्यानंतर भरलेले डिटेल्स व्हेरिफाय करा.
- त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर वन टाईम रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल.
- तुम्ही जनरेट आयडी पासवर्डचा वापर करुन लॉगइन करु शकता.
ओटीआरचे फायदे काय?
- ओटीआर प्लॅटफॉर्म आयोगाच्या वेबसाईटवर 24 तासांसाठी खुला असेल.
- ओटीआर प्लॅटफॉर्ममुळे वेळेची बचत होणार असून अर्ज करण्याची प्रक्रिया आणखी सोपी होणार आहे.
- यूपीएससीनं दिलेल्या माहितीनुसार, परीक्षार्थीची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर त्यांची सर्व माहिती आयोगाच्या वेबसाईटवर सुरक्षितपणे सेव्ह केली जाईल.
- जेव्हा परीक्षार्थी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरतील त्यावेळी त्यांची माहिती आपोआप भरली जाईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- MPSCचा मोठा निर्णय! उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठीच्या पर्यायामध्ये सुधारणा
- Maharashtra TET Scam: टीईटी घोटाळ्यात नाव आलेल्या अब्दुल सत्तारांच्या मुलींचे वेतनही थांबवले
- ICSI CS Result 2022: ICSI CS प्रोफेशनल प्रोग्रामचा निकाल जाहीर; कसा डाउनलोड कराल रिझल्ट? जाणून घ्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI