UPSC IFS Main Exam 2022 DAF II Released: केंद्रीय लोकसेवा आयोगानं (UPSC Exams) भारतीय वन सेवा मुख्य परीक्षा 2022 साठी Daf II जारी केला आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केला आहे, ते यूपीएससीच्या (UPSC Official Website) अधिकृत वेबसाईटला भेट देऊन फॉर्म भरू शकतात. फॉर्म भरण्यासाठी upsconline.nic.in. या वेबसाईटला भेट द्या. 


UPSC IFS मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी DAF II भरावा. त्याशिवाय त्यांना पुढच्या टप्प्यात म्हणजेच, मुलाखतीला बसण्याची संधी मिळणार नाही.


शेवटची तारीख काय? 


UPSC IFS DAF II भरण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2023 आहे. या दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत फॉर्म भरता येणार आहे. यानंतर अर्ज वेबसाईटवर उपलब्ध होणार नाही. DAF II भरणाऱ्या उमेदवारांमधून निवडलेल्या उमेदवारांना पर्सनॅलिटी राऊंडसाठी बोलावलं जाईल.


नोटीसमध्ये काय लिहिलंय? 


या परीक्षेसंदर्भात जारी केलेल्या नोटीसमध्ये असं म्हटलं आहे की, पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी म्हणजेच, 17 जानेवारी 2023 पूर्वी ऑनलाईन तपशीलवार अर्ज-II (DAF-II) मध्ये झोन/कॅडर्सच्या पसंतीचा क्रम अनिवार्यपणे भरला पाहिजे. DAF-II किंवा समर्थनार्थ कागदपत्रं सादर करण्यात नियोजित तारखेच्या पलीकडे कोणत्याही विलंबास परवानगी दिली जाणार नाही आणि IFOS परीक्षा - 2022 ची उमेदवारी रद्द केली जाईल. या संदर्भात कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.


कसा भराल फॉर्म? 


फॉर्म भरण्यासाठी, सर्वात आधी अधिकृत वेबसाईट म्हणजेच, upsconline.in वर भेट द्या. 
'DAF for VARIOUS EXAMINATIONS OF UPSC’ and click on Indian Forest Service (Main) Examination, 2022 [ DAF-II ]' येथे क्लिक करा. 
समोर नवं पेज ओपन होईल. 
तिथे लॉगइन लिंक, रोल नंबर आणि पासवर्ड टाका आणि लॉग इन करा. 
भरलेला फॉर्म तुमच्या स्क्रिनवर दिसेल. 
तिथून DAF II भरा आणि सबमिट करा. 
आता फॉर्मची प्रिंट आऊट घ्या आणि तुमच्याकडे ठेवा. 


फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


तुम्हीच सांगा! बोर्ड परीक्षेतील कॉपी प्रकरणं कशी रोखायची?; शिक्षक, विद्यार्थी, पालकांकडून बोर्डाने मागितला कृती कार्यक्रम


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI