UPSC Recruitment 2022: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) एक भरती अधिसूचना जारी केली आहे, त्यानुसार आयोगाद्वारे विविध पदांची भरती केली जाईल. संघ लोकसेवा आयोगाने प्रोसिक्यूटर, स्पेशलिस्ट, सहाय्यक प्राध्यापक आणि पशुवैद्यकीय अधिकारी या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार UPSC च्या अधिकृत साइट upsc.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीतून 52 पदे भरली जाणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 ऑक्टोबर 2022 आहे. प्रोसिक्यूटरसाठी 12, स्पेशलिस्टच्या 28, सहाय्यक प्राध्यापकाच्या 2 आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या 10 जागा रिक्त आहेत.


पात्रता
प्रोसिक्यूटर - कायद्यातील बॅचलर पदवी आणि किमान एका वर्षांचा अनुभव.
कमाल वयोमर्यादा- 30 वर्षे.
वेतनमान -  लेवल 8


स्पेशालिस्ट कॅडर (जनरल मेडिसिन) - एमबीबीएस पदवी आणि पीजी पदवी किंवा पीजी डिप्लोमा आणि तीन वर्षांचा अनुभव.
कमाल वयोमर्यादा- 40 वर्षे.
वेतनमान - लेवल 11



सहाय्यक प्राध्यापक - आयुर्वेद चिकित्सा मध्ये पदवी आणि PG पदवी.
वेतनमान - लेवल 10
कमाल वयोमर्यादा- 50 वर्षे.


पशुवैद्यकीय अधिकारी -
कमाल वयोमर्यादा- 35 वर्षे.
वेतनमान - लेवल 10


अर्ज फी - 25 रुपये, क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे फी भरता येते.
SC, ST, महिला आणि दिव्यांग प्रवर्गासाठी कोणतेही शुल्क नाही.


UPSC च्या इतर दोन भरती सध्या सुरू आहेत


अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2022
UPSC अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2022 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर आहे. या भरतीद्वारे, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकीमधील अभियांत्रिकी सेवा अंतर्गत गट A आणि B च्या 327 पदांची भरती केली जाईल. अभियांत्रिकी सेवा प्राथमिक परीक्षा 19 फेब्रुवारी 2023 रोजी घेतली जाईल. अभियांत्रिकीची पदवी असलेले यासाठी अर्ज करू शकतात.


जिओ सायंटिस्टसाठी भरती


UPSC ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 21 सप्टेंबर 2022 पासून जिओ सायंटिस्ट भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 11 ऑक्टोबर 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या परीक्षेद्वारे एकूण 285 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in वर जाऊन अर्ज भरावा लागेल.


 


संबंधित बातम्या


UPSC Exam 2022 : UPSC कडून वन टाईम रजिस्ट्रेशन प्लॅटफॉर्म लॉन्च; फायदे काय?


MPSCचा मोठा निर्णय! उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठीच्या पर्यायामध्ये सुधारणा


 


 


 


 


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI