UPSC Exam Tips :  केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा सर्वात कठीण मानली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक असतात.  या कारणास्तव याला सर्वात मोठी स्पर्धात्मक परीक्षा देखील म्हटले जाते. दरवर्षी लाखोंच्या संख्येने लोक यात सहभागी होतात, पण फार कमी लोक यशस्वी होतात. यूपीएससी परीक्षेचे तीन टप्पे असतात. आधी पूर्व परीक्षा, मग मुख्य परीक्षा आणि शेवटी मुलाखत. ही केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी अनेकजण वर्षानुवर्षे क्लासेला जातात, काही वर्ष खर्ची घालतात. पण जे नोकरी करतात त्यांच्यासाठी परीक्षेची तयारी करणे अधिक कठीण असते. त्यामुळे नोकरीवर असणारे अनेकजण इच्छा असूनही या परीक्षेसाठी अर्जच करत नाहीत.


पूर्णवेळ नोकरीबरोबरच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करणे हे मोठे आव्हान आहे. या समस्येवर भारतीय वन सेवा अधिकारी (IFS) हिमांशू त्यागी यांनी काही टिप्स दिल्या आहेत. पूर्ण वेळ नोकरी करत असताना UPSC परीक्षेची तयारी कशी करू शकतात याबद्दल त्यांनी मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट X वर याबद्दल पोस्ट केले आहे. यामध्ये त्यांनी सांगितले -


> सकाळी 3.30 वाजता उठून चार तास अभ्यास करा.


> काम संपल्यानंतर अर्धा तास वाचन करा. 


> प्रवासाच्या वेळेचा योग्य वापर करा आणि या काळात अभ्यास करा.


> तुमच्या फोन आणि लॅपटॉपमध्ये अभ्यासाचे साहित्य ठेवा. जेणेकरून तुम्हाला ऑफिसमध्ये वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करता येईल.


> वीकेंडला दहा तास अभ्यास करा.


 






यासोबतच त्यांनी सांगितले की, परीक्षा देण्याचा आत्मविश्वास मिळवण्यासाठी हे वेळापत्रक एक ते दोन वर्षे सतत पाळा. हिमांशू त्यागी यांनी दिलेल्या सल्ल्यावर आता लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.


काही लोकांना या टिप्स फायदेशीर वाटत आहेत. तर, काहींना असे करणे शक्य नसल्याचे म्हणणे आहे. एका यूजरने सांगितले की, 'मला एक प्रश्न आहे - सकाळी 3.30 वाजता उठल्यानंतर मी ऑफिसमध्ये अॅक्टिव्ह राहू शकेन का, मला दिवसभर थकवा जाणवणार नाही का?' दुसरा युजर म्हणाला, 'मला डेव्हलपर म्हणून काम आहे, मला ऑफिसच्या कामासाठीही अभ्यास करावा लागतो. मला वाटते की तुम्हाला एक साधी सोपी नोकरी असेल तरच तुम्ही या वेळापत्रकानुसार काम करू शकाल.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI