मुंबई : तृतीयपंथी विद्यार्थ्यांना विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात उच्च शैक्षणिक फी (Educational Fees) माफिचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आता विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तृयीयपंथी विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक फी विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ भरणार आहे.  याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. 


विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तृयीयपंथी विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक फी (शैक्षणिक शुल्क)  विद्यापीठाने स्वनिधीतून भरावी. तसेच या विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण उपलब्ध होईल यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 5 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व कुलगुरूंनी बहुमताने हा निर्णय मान्य केला होता. त्यानुसार आज उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शासन निर्णय काढत यापुढे तृतीयपंथी विद्यार्थ्यांना विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात फी माफ करण्याचा शासन निर्णय काढला आहे. 


विद्यापीठांनी पुढाकार घेण्याचं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले होते. 


दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 5 डिसेंबर रोजी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020  अंमलबजावणी संदर्भात बैठक झाली होती. यावेळी राज्यातील एनईपी 2020 च्या अंमलबजावणीची सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला होता. आगामी शैक्षणिक वर्षात एनईपीची सर्वांनी प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी सूचना यावेळी पाटील यांनी दिल्या होत्या. याचवेळी विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तृयीयपंथी विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक फी (शैक्षणिक शुल्क)  विद्यापीठाने स्वनिधीतून भरावी. तसेच या विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण उपलब्ध होईल यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले होते. 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI