UGC NET 2021 Result : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नोव्हेंबर 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता चाचणी ( UGC NET) चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) दोन दिवसांपूर्वी यासंदर्भात माहिती दिली होती. यानुसार, UGC NET निकाल 2021-22 ( NET निकाल ) आज जाहीर करण्यात आला आहे. UGC NET चा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सी ( NTA NET) द्वारे जाहीर करण्यात आला आहे.  आयोगाने NET जून 2021 आणि NET डिसेंबर 2020 चे निकाल एकाच वेळी जाहीर केले आहेत. NET निकाल जाहीर झाल्यानंतर, तुम्ही NTA NET च्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जाऊन तुमचा निकाल तपासू शकता. कसा तपासाल तुमचा निकाल? जाणून घ्या सविस्तर


UGC NET निकाल 2021-22 निकाल आज जाहीर


कोरोना विषाणूच्या साथीमुळे नेट परीक्षा 2020 पासून पुढे ढकलण्यात येत होत्या. UGC NET डिसेंबर 2020 आणि UGC NET जून 2021, दोन्ही परीक्षा वेळेवर होऊ शकल्या नाहीत. यानंतर, यूजीसी आणि एनटीएने एकत्रितपणे नोव्हेंबर 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान दोन्ही नेट परीक्षा एकामागून एक घेतल्या. आता दोघांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. UGC NET निकाल 2021-22 चे तपशील देखील तुम्ही NTA वेबसाइट nta.ac.in, या वेबसाइटला भेट देऊन आवश्यक माहिती देखील मिळवू शकता.


NET चा निकाल कसा तपासायचा?
-UGC NET च्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर भेट द्या . 
-साईटच्या मुख्यपृष्ठावर खाली स्क्रोल करा. 
-तुम्हाला UGC NET निकाल डिसेंबर 2020 आणि UGC NET निकाल जून 2021 च्या दोन वेगवेगळ्या लिंक्स मिळतील. 
तुम्हाला ज्या परीक्षेचा निकाल पहायचा आहे त्यावर क्लिक करा. 
-त्यावर एक नवीन लॉगिन पेज उघडेल. 
-येथे तुमचा UGC NET अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि स्क्रीनवर दिसणारी सुरक्षा पिन (security pin ) टाकून सबमिट बटणावर क्लिक करा. 
-तुमचे लॉगिन पेज उघडेल. 
-येथे तुम्हाला तुमचा निकाल दिसेल.
-तुम्ही तुमचा UGC NET निकाल देखील पेजवरून डाउनलोडही करू शकता. 
-स्कोअरकार्ड डाऊनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट काढा
-ती तुमच्याकडे सुरक्षित ठेवा.


महत्वाच्या बातम्या : 



 


Education Loan Information:
Calculate Education Loan EMI


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI