Puntamba Farmers : सध्या राज्यातील शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न आहेत. शेतकरी कधी आस्मानी तर कधी सुलताना संकटांचा सामना करत आहेत. अशातच आता शेतकरी प्रश्नांवरुन अहमदनगर जिलह्यातील पुणतांबा येथील शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. आज पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी पुन्हा विशेष ग्रामसभेचं आयोजन केलं आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नसल्याने पुन्हा एकदा शेतकरी संपावर या ग्रामसभेत चर्चा होणार आहे.


दरम्यान, 19 मे रोजी देखील पुणतांबा गावात शेतकऱ्यांनी बैठकीचे आयोजन केलं होते. या बैठकीत शेतकऱ्यांच्या समोरील वाढत्या समस्यांवर चर्चा झाली. तसेच शेतकऱ्यांच्या अन्य प्रश्नांवर देखील चर्चा झाली.  या बैठकीला पंचक्रोशीतल्या शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती. आज पुन्हा शेतकरी एकत्र येणार आहेत पुणतांब्यात आज ग्रामसभा होणार आहेत. या सभेत काही महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.


आंदोलनाची दिशी ठरणार?


शेतमाला दर मिळत नसल्याने शेतकरी सध्या चिंतेत आहेत. त्यामुळे शेतमालाला दर मिळवून देण्यासाठी पुणतांब्यातून पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली जाऊ शकते. याबाबतचा निर्णय किंवा घोषणा आज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आजच्या ग्रामसभेतून आंदोलनाची पुढची दिशा ठरण्याची शक्यता आहे. सकाळी 11 वाजता ही ग्रामसभा होणार आहे. पुणतांबा हे ऐतिहासिक शेतकरी संपाचे गाव असून आज याठिकाणी मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


2017 चा ऐतिहासिक संप


शेतकऱ्यांना कर्जमाफीसह विविध प्रश्‍नांबाबत 2017 साली संपाची कल्पना सर्वप्रथम पुणतांबे येथूनच पुढे आली. या ठिकाणी ग्रामसभेत ठराव करुन एक जूनपासून शेतकरी संपाची घोषणा झाली होती. त्यानंतर राज्यभरातील शेतकरी संपाच्या या आंदोलनात पुढे आले होते. राज्यात सुमारे अडीच हजार ठराव झाले होते. त्यात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, शेतीमालाला हमीभाव द्यावा, दुधाला पन्नास रुपये लिटर भाव मिळावा, शेतमालाला योग्य भाव मिळावा, स्वामिनाथन आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करावी आदी मागण्या करण्यात आल्या होत्या. सध्या देखील शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी आहेत. शेतमालाला मिळणारा कमी दर, वाढत जाणाऱ्या खतांच्या किंमती यासह सरकारची धोरणे यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.


महत्वाच्या बातम्या: