SSC HSC Exam Timetable : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा  2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालवधीत होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे.  


प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे. 


राज्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळाकडून दहावी व बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक याआधी 19 सप्टेंबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानतंर वेळापत्रकाबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. यासाठी मंडळाकडून 15 दिवसांची मुदत देण्यात आली होती. वेळापत्रकाबाबत आलेल्या सूचनांनंतर दहावी आणि बारावीचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 


दहावी-बारावीच्या परीक्षांचे सविस्तर अंतिम वेळापत्रक मंडळाच्या  www.mahahsscboard.in  या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. मंडळाकडून देण्यात आलेल्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी,अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. 


CBSE Exam : सीबीएसईच्याही तारखा जाहीर 


दरम्यान, आज सकाळीच सीबीएसईच्या (CBSE Exam) दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा देखील जाहीर झाल्या आहेत. बोर्डाने काल परिपत्रक जाहीर करत ही माहिती दिली आहे. दहावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधी दरम्यान होणार आहेत. तर बारावीच्या परीक्षा या 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिलदरम्यान होतील. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून cbse.gov.in या संकेतस्थळावर वेळापत्रक देखील देण्यात आलं आहे. 
 


महत्वाच्या बातम्या


​​CBSE 12th Date Sheet 2023: सीबीएसई परीक्षांच्या तारखा जाहीर, दहावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21मार्च आणि बारावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिल दरम्यान


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI