Saraswat Bank Recruitment 2022 : बँकेत जॉब शोधणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची नामी संधी. सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडनं लिपिक संवर्गातील कनिष्ठ अधिकारी (मार्केटिंग आणि ऑपरेशन्स) च्या 300 पदांच्या भरतीसाठी आज, म्हणजेच 31 डिसेंबर 2021 रोजी अर्ज प्रक्रिया समाप्त करणार आहे. पात्र उमेदवार सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेद्वारे कनिष्ठ अधिकारी पदासाठी अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या एकूण 300 पदे भरण्यात येणार आहेत. जर तुम्हाला या पदांसाठी अर्ज करायचा असेल किंवा त्यांच्याबद्दल तपशीलवार माहिती मिळवायची असेल, तर तुम्ही सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
येथे हे देखील नमूद करणे आवश्यक आहे की, सारस्वत सहकारी बँकेच्या कनिष्ठ अधिकारी पदांसाठी 22 डिसेंबर 2021 पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. तसेच या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 आहे. शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करा अन्यथा तुमचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असं बँकेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. या भरती प्रक्रियेतून एकूण 300 पदं भरली जाणार आहेत.
नोकरीसाठी पात्रतेची अट
ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून पदवी पूर्ण केलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवाराला या क्षेत्रात किमान 1 वर्षाचा कामाचा अनुभव असणं गरजेचं आहे. तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवारांना वयाची अटही बँकेच्या वतीनं घालण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 30 वर्षांच्या आत असणं गरजेचं आहे.
कशी होईल निवड?
सारस्वत सहकारी बँकेच्या या पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल. जे उमेदवार बँकेचे मापदंड पूर्ण करतील त्यांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल. या पदांबाबत वेळोवेळी अधिकृत वेबसाईटवर माहिती देण्यात येईल. उमेदवारांनी यासंदर्भातील अधिक माहितीसाठी बँकेची वेबसाइट saraswatbank.com ला भेट द्यावी.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- ESIC Recruitment 2021-22 : सरकारी नोकरीच्या शोधात आहात? ESIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कसा कराल अर्ज?
- WCR Recruitment 2021 : राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या खेळाडूंसाठी नोकरीची संधी, असा करा अर्ज
- Upcoming Government Jobs 2022 : नव्या वर्षात सरकारी नोकऱ्यांचा पाऊस; पाहा संपूर्ण यादी
- Bank Recruitment : कनिष्ठ अधिकारी पदाच्या 300 रिक्त जागांसाठी भरती, येथे करा अर्ज
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI