RTE Admission 2023 : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (Right To Education) 25 टक्के आरक्षित जागांसाठी राज्यात यावर्षी एकूण जागांच्या तिपटीहून अधिक अर्ज आले आहेत. शालेय शिक्षण विभागाकडून एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रत्येक जिल्ह्यात लॉटरी पद्धतीने या अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांमधून प्रवेशासाठी 25 टक्के विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.

पालकांना लॉटरीची प्रतीक्षा

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात आले. राज्यातील 1 लाख 1 हजार 969 जागांसाठी 3 लाख 65 हजार 258 म्हणजेच प्रवेश क्षमतेच्या तीन पटीहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे कोणत्या विद्यार्थ्याला लॉटरीच्या माध्यमातून प्रवेश मिळणार याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रवेशासाठी अर्ज भरलेल्या सर्व पालकांना लॉटरीची प्रतीक्षा आहे. 

पुणे जिल्हात सर्वाधिक अर्ज 

सर्वाधिक आरटीई प्रवेशाच्या जागा पुणे जिल्ह्यात असून यंदा प्रवेशासाठी सर्वाधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. पुण्यातील आरटीईच्या 15 हजार 655 जागांसाठी 77 हजार 550 विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. 

8 हजार 828 शाळांमध्ये 1 लाख 1 हजार 969 जागा उपलब्ध

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (Right To Education Act) खासगी प्राथमिक शाळांमधील 25 टक्के जागांवर आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली जाते. आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला 1 मार्चपासून सुरुवात झाली. तर ऑनलाईन अर्जांसाठी अंतिम मुदत 25 मार्च होती. यंदाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत 8 हजार 828 शाळांमध्ये 1 लाख 1 हजार 969 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. 

आरटीई प्रवेशाची जिल्हानिहाय स्थिती

जिल्हा         

शाळा          

जागा          

प्राप्तअर्ज

अहमदनगर          364          2825 9818
अकोला 110 1946  7111
अमरावती     236  2305 9407
 औरंगाबाद    547407320779
भंडारा        89   7633156
बीड225 1827  7696
बुलढाणा 227 2246  7054
चंद्रपूर 186 1503  4830
धुळे931006 3712
 गडचिरोली 66 4621380
गोंदिया   131 864 3959
हिंगोली   755392751
 जळगाव 282312211291
 कोल्हापूर  32532704961
लातूर  20016697451
 मुंबई 1272520218467
मुंबई 2  651367     ---------
नागपूर   653657736560
नांदेड 232225111116
नंदुरबार  453101248
नाशिक401485422122
उस्मानाबाद  1078772947
पालघर     26654834633
परभणी 15510563827
पुणे      9361565577550
रायगड   264425610499
 रत्नागिरी    929291110
सांगली   22618863152
सातारा     21718214489
सिंधुदुर्ग 49286232
सोलापूर    29523207738
ठाणे    6291227821682
वर्धा  11111114986
वाशिम    997862766
यवतमाळ   19419407448

हेही वाचा

RTE Admission 2023 : आरटीई प्रवेशाला आजपासून प्रारंभ, पहिली ते आठवीपर्यंत मिळणार मोफत शिक्षण


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI