India Passport Index : पासपोर्ट इंडेक्सने बुधवारी आपला नवीन अहवाल प्रकाशित केला आहे. ज्यामध्ये भारताची मोबिलिटी स्कोअर घसरला आहे. भारताच्या स्कोअरमध्ये या वर्षी सर्वात मोठी जागतिक घसरण झाली आहे. भारताचा मोबिलिटी स्कोअर 70 वर आहे. 2022 मध्ये भारताचे रँकिंग 73 च्या मोबिलिटी स्कोअरसह 138 व्या स्थानावर होते. आता, 2023 मध्ये ते सहा स्थानांनी घसरून 144 व्या स्थानावर आले आहे.
पासपोर्ट इंडेक्समध्ये 'टाइमशिफ्ट' हे नवीन फीचर समाविष्ट केल्यानंतर ही रँकिंग जाहीर करण्यात आली आहे. या वैशिष्ट्याद्वारे, विविध देशांचे पासपोर्ट त्यांच्या गेल्या काही वर्षांतील एकूण कामगिरीवरून तपासले जातात. या कारणास्तव, भारताचे रँकिंग कोरोना महासाथीच्या आजारापूर्वीच्या तुलनेत लक्षणीय घसरले आहे.
युरोपियन युनियनच्या धोरणामुळे भारताच्या क्रमवारीत मोठी घसरण झाल्याचे सांगण्यात येत आहे. या धोरणामुळे आता 2023 मध्ये सर्बियासारख्या देशात जाणाऱ्या भारतीय नागरिकांना व्हिसा द्यावा लागणार आहे.
अमेरिका आणि जर्मनीच्या तुलनेत चीनची कामगिरीही या निर्देशांकात खूपच खराब झाली आहे. चीनने युरोपियन युनियन आणि भारत, जपान यांसारख्या प्रतिस्पर्ध्यांसोबत मोफत व्हिसा करार केला नाही, त्यामुळे त्याची कामगिरी घसरली आहे. पासपोर्ट इंडेक्समध्ये चीनचे रँकिंग 118 आहे.
आशियातील दोन देशांनी या निर्देशांकात चांगले स्थान मिळवले आहे. दक्षिण कोरिया 174 च्या मोबिलिटी स्कोअरसह 12 व्या क्रमांकावर आहे जो आशियाई देशांमध्ये सर्वोच्च आहे. आणि जपान 172 च्या मोबिलिटी स्कोअरसह 26 व्या स्थानावर आहे.
या वर्षी केवळ 10 देशांनी त्यांच्या मोबिलिटी स्कोअरमध्ये वाढ केली आहे. पासपोर्ट क्रमवारीत स्वीडनने जर्मनीला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे. रँकिंगमध्ये ज्या देशांच्या मोबिलिटी स्कोअरमध्ये वाढ झाली आहे, त्यापैकी 40% देश आफ्रिकेतील आहेत. आफ्रिकन देश केनियाने चार स्थानांनी झेप घेतली असून, या वर्षातील सर्वात मोठी वाढ नोंदवली आहे.
पासपोर्ट इंडेक्सचे सह-संस्थापक हंट बोगोसियन यांनी भारताच्या क्रमवारीत घसरणीबद्दल सांगितले की, ' कोरोना महासाथीदरम्यान अनेक देशांनी व्हिसा नियम कडक केले होते. गेल्या दोन वर्षात ते कमी करण्यात आले होते ज्यामुळे देशांनी जागतिक मोबिलिटीमध्ये चांगली कामगिरी केली होती. परंतु या वर्षी आतापर्यंत मंदी दिसली आहे. चीन आणि भारत या दोन्ही देशांनी त्यांच्या पासपोर्टची गतिशीलता कमी केली आहे, जरी आमचा असा विश्वास आहे की चीनला त्यांच्या सीमा पुन्हा उघडण्याचे परिणाम पूर्णपणे जाणवले नाहीत.