मुंबई : एकीकडे 10 वी आणि 12 वी चे निकाल जाहीर झाल्यानंतर आता शैक्षणिक वर्ष 2020-21 करीता तंत्रशिक्षण (पॉलिटेक्निक) प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया 10 ऑगस्ट 2020 ते 25 ऑगस्ट 2020 या कालावधीत राबविण्यात येणार असून त्याचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. प्रथम वर्ष पोस्ट एसएससी अभियांत्रिकी पदविका आणि औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन, खाद्यपेय व्यवस्था ततंत्रज्ञान, सरफेस कोटिंग तंत्रज्ञान या अभ्यासक्रमामधील प्रथम वर्ष पोस्ट एचएससी अभियांत्रिकी पदवी प्रवेशप्रक्रिया यामध्ये राबविली जाणार आहे.


यंदा 10 ऑगस्टपासून राबविण्यात येणाऱ्या या प्रवेश प्रक्रियेत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर या अभ्यासक्रमांच्या प्रवेश नियमांत काही बदल तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रस्तावित केले होते. या बदलांना उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून मंजुरी देण्यात आली असून या नियमांची यंदाच्या प्रवेश प्रक्रियेपासून अमंलबजावणी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सोयींसाठी राज्यामध्ये अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी 336 सुविधा केंद्रांची आणि बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांसाठी 242 सुविधा केंद्रांची निवड केलेली आहे. सुविधा केंद्रास भेट देऊन कागदपत्रांची प्रत्यक्ष छाननी करणे या पद्धती सोबतच ई-स्क्रूटनीची संकल्पना राबविण्यात येणार आहे. याद्वारे अर्जदारास प्रत्यक्ष सुविधा केंद्रास भेट देण्याची आवश्यकता नाही.


पाहा व्हिडीओ : राज्यात पॉलिटेक्निकसाठी प्रवेशाप्रक्रिया आजपासून सरु



अर्ज भरण्यापासून संस्थेत प्रवेश निश्चिती करण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया ते स्वतः ऑनलाईन माध्यमातून करू शकतील. प्रवेशासंबंधी सुविधा केंद्रांची यादी आणि ई स्क्रुटिनी पद्धतीची माहिती ,अर्ज भरण्यासाठी आवश्यक ती माहिती , हेल्पलाईन क्रमांक इत्यादी सविस्तर माहिती http://www.dtemaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.


वेळापत्रक :




  • 10 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट - ऑनलाईन अर्ज नोंदणी करणे, कागदपत्रे स्कॅन छायाप्रती अपलोड करणे आणि छाननीची योग्य पद्धत निवडणे

  • 11 ते २५ ऑगस्ट - कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे

  • 28 ऑगस्ट - तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे

  • 29 ते 31 ऑगस्ट - तात्पुरत्या गुणवत्ता याद्यांमध्ये विद्यार्थ्यांना तक्रार असल्यास , तक्रार करणे

  • 2 सप्टेंबर - अंतिम गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे


महत्त्वाच्या बातम्या :

Maha TET Results 2020 | टीईटीचा निकाल जाहीर, 16 हजाराहून अधिक शिक्षक पदासाठी पात्र

समाजातील तेढ, भेदभाव दूर करणारं नवं शैक्षणिक धोरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Education Loan Information:

Calculate Education Loan EMI