नवी दिल्ली : भारताच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी विशेष सुरक्षा गट म्हणजे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपकडे असते. पंतप्रधानांचे नवी दिल्लीतील कार्यक्रम किंवा देशभर जिकडे दौरा असतो त्यावेळी त्यांना एसपीजीचं संरक्षण असतं. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपमध्ये वेगवेगळ्या पदांवर काम करणाऱ्यांना त्यांचं पद, अनुभव आणि सेवेतील अनुभव याच्या आधारावर वेगेवगळा पगार असू शकतो. जो त्यांच्या रँक आणि अनुभवावर आधारित असतो. खरंतर एसपीजीच्या उच्च पदांवर काम करणाऱ्या म्हणजेच प्रामुख्यानं एसपीजीच्या सुरक्षा इंचार्जचा पगार किती असतो हे सार्वजनिक दृष्ट्या समोर आणलं जात नाही कारण पगाराची रक्कम गोपनीयतेच्या कक्षेत येते. 

Continues below advertisement


 
पंतप्रधानांच्या सुरक्षेत तैनात असणाऱ्या कमांडोंचं वेतन त्यांच्या अनुभवानुसार वाढत जातं. मिडिया रिपोर्ट्स नुसार एका एसपीजी कमांडरचं मासिक वेतन किमान 84236 ते 239457 रुपयांदरम्यान असतं.  जे त्यांच्या रँक आणि अनुभवाच्या आधारावर ठरतं. याशिवाय सर्व भत्ते सरकारकडून दिले जातात. 11 ते 20 वर्षांचा अनुभव असणाऱ्या सुरक्षा अधिकाऱ्यांचा वार्षिक पगार 8 लाख ते 18 लाखांदरम्यान अशतो. याशिवाय एसपीजीमधील अधिकाऱ्यांना विशेष भत्ते, जोखीम भत्ते, याशिवाय इतर लाभ देखील सरकारकडून दिले जातात. याशिवाय त्यांना ड्रेस अलाऊन्स देखील दिला जातो. ऑपरेशन ड्यूटीवर तैनात असलेल्यांना 27800 तर नॉन ऑपरेशनल ड्युटीवर असणाऱ्यांना 21225 रुपये मिळतो, अशी माहिती आहे. 


पगाराची अधिकृत रक्कम सार्वजनिक नाही


दरम्यान, सुरक्षा इंचार्ज म्हणून एक वेगळं पद असतं, त्या पदावरील अधिकाऱ्याच्या आदेशाचं पालन एसपीजी कमांडोला करायचं असतं. या अधिकाऱ्याच्या वेतनाची रक्कम सध्या सार्वजनिक करण्यात आलेली नाही. मात्र, एसपीजी कमांडोच्या पगाराच्या रकमांवरुन अंदाज लावता येऊ शकतो की एसपीजी इंचार्जला पगार किती असेल. या पदांवरील अधिकाऱ्यांचा पगार अनुभव आणि रँकनुसार निश्चित केला जातो. खरंतर एसपीजी कमांडो होण्यासाठी सरकारकडून अनेक कठोर अटी ठेवल्या जातात त्याचा स्वीकार करणं आणि त्या पूर्णपणे पाळणं अनेकांना जमत नाही. 


टीप : एसपीजी कमांडो आणि अधिकाऱ्यांच्या पगाराबाबतची रक्कम ही प्राथमिक माहितीवर आधारित आहे. एसपीजीच्या पगारासंदर्भात एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI