मुंबई : आदिवासी कुटुंबातील विद्यार्थ्यांना  ( Students ) आता आयएएस (IAS) आणि आयपीएस (IPS) होण्याची संधी मिळणार आहे. दरवर्षी शंभर विद्यार्थ्यांना  प्रशिक्षण मिळणार असून विद्यार्थ्यांना  12 हजार  विद्या वितेन देखील मिळणार आहे, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी याबाबतची माहिती दिली आहे. राज्य शासन आणि आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने यासाठी पुढाकार घेतला आहे. 


"राज्यातील प्रत्येक तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येक शैक्षणिक सुविधा पोहोचावी, यासाठी राज्य सरकार सदैव तत्पर आहे. राज्य शासनाच्या स्वतंत्र योजनेअंतर्गत आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनाही आयएएस, आयपीएस होण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. 




राज्य शासन आणि आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने यासाठी पुढाकार घेतला असून या योजनेसाठी चार कोटी रूपयांची स्वतंत्र योजना राबण्यात येणार आहे. यातून दरवर्षी शंभर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळणार आहे. विद्यार्थ्यांना 12 हजार रूपये विद्या वेतन मिळणार आहे. याबरोबरच अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्लीमध्ये राहण्याची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI