Northern Railway Senior Resident Recruitment 2021 : सरकारी नोकरी मिळण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात. नुकतेच उत्तर रेल्वेने सीनियर रेसिडेंट अधिकारी या पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छूक उमेदवार 11ते 12 नोव्हेंबर च्या दरम्यान वॉक-इन-इंटरव्ह्यूमध्ये सहभागी होऊ शकतात. उत्तर रेल्वेने अधिकृतपणे वरिष्ठ निवासी पदासाठीच्या नोकरसंबंधित नोटिफिकेशन जाहिर केले आहे. या पदासाठी इच्छूक असणाऱ्यांना MCI/NBE द्वारे संबंधित विषयात मान्यताप्राप्त डिप्लोमा आणि डिग्री असणे आवश्यक आहे.
 
भरती 2021: उत्तर रेल्वे वरिष्ठ निवासी अधिकारी या रिक्त जागांचा तपशील-  
अॅनेस्थीसिया - 2 पद
ईएनटी - 1 पद
जनरल मेडिसिन - 10 पद
जनरल सर्जरी - 6 पद
मायक्रोबायोलॉजी - 1 पद
ओबीएस  आणि गायनॅक - 1 पद
ऑन्कोलॉजी - 1 पद
ऑर्थोपेडिक्स - 3 पद
ऑप्थमोलॉजी- 2 पद
पॅथोलॉजी - 1 पद
बाल रोग - 2 पद
रेडियोलॉजी - 2 पद


वयोमर्यादा
उत्तर रेल्वेने अधिकृतपणे वरिष्ठ निवासी पदासाठीच्या नोकरसंबंधित जाहिर केलेल्या नोटिफिकेशननुसार या पदासाठी 37 वर्ष वयोमर्यादा असणार आहे. 


मानधन 
निवडण्यात आलेल्या उमेदवारांना 67700 ते 208700 मानधन दिले जाणार आहे. 


Nykaa IPO Subscription: Nykaa चा IPO आजपासून ओपन; पाहा शेअर्सची किंमत


पदासाठी  इच्छूक असलेल्या उमेदवारांनी  11 आणि 12 नोव्हेंबरला होणाऱ्या वॉक-इन-इंटरव्ह्यूमध्ये सहभागी व्हावे. ही मुलाखत नवी दिल्लीमधील अकादमिक ब्लॉक उत्तर रेल्वे सेंट्रल हॉस्पिटल येथील ऑडिटोरियमच्या पहिला मजल्यावर होणार आहे. मुलाखतीला जाताना आवश्यक डॉक्यूमेंट्सची व्हेरिफाईड कॉपी स्कॅन करूनसोबत ठेवावी. सकाळी 8 वाजता मुलाखतीला इच्छूक उमेदवारांनी उपस्थित रहावे. 


महत्वाच्या बातम्या : 



 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI