नवी दिल्ली : खासगी कोचिंग सेंटर्सच्या (Coaching Centres) मनमानी कारभारावर लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारने ( Central Government) पावले उचलली आहेत.  कोचिंग क्लासेससाठी केंद्र सरकारकडून नव्या मार्गदर्शक सूचना ( Central Government  guidelines) जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार 16 वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश देता येणार नाही. रँक, गुणांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे गॅरंटी देणे कोचिंग क्लासेसना महागात पडणार आहे. तसेच आग प्रतिबंधक उपाययोजना करणे सर्व क्लासेस ना बंधनकारक असणार आहे. 


केंद्र सरकारच्या नव्या नियमांनुसार कुणालाही खासगी कोचिंग सेंटर उघडता येणार नाही. त्यासाठी सर्वात आधी नोंदणी करावी लागेल. त्याशिवाय 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश देता येणार नाही. त्याशिवाय कोटिंग सेंटर चालवणारे विद्यार्थ्यांकडून अव्वाच्या सव्वा फी वसूल करता येणार नाही. नियमावलीतील व्याख्येनुसार 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जिथे शिक्षण दिले जाते त्या जागेला कोचिंग क्लास समजले जाईल


केंद्र सरकारकडून कठोर नियम - 


 NEET अथवा JEE ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. त्याशिवाय खासगी कोचिंग क्लासमध्ये मनमानी फी आकारली जाते. त्यामुळे या सर्वांना लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारकडून नियमावली जारी करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार, आयआयटी जेईई, एमबीबीएस, नीट यासारख्या प्रोफेशनल कोर्साठी कोचिंग सेंटरमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय सुरक्षासंदर्भात एनओसी असणंही बंधनकारक करण्यात आलेय. परीक्षा आणि त्याच्या निकालाच्या दबावाशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांना मानसिक आणि मानसिक आरोग्याशी संबंधित धडे आणि पाठबळ द्यावे, असेही नियमांत म्हटलेय.  


नियम मोडल्यास आर्थिक दंड - 


कोचिंग सेंटर्सने केंद्र सरकारच्या नियमांनुसार नोंदणी करणं अनिवार्य आहे. त्याशिवाय सर्व नियमांचं पालनही करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना गुणांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे गॅरंटी देणे कोचिंग क्लासेसना महागात पडणार आहे. कोचिंग क्लासेसने नियम मोडल्यास आर्थिक दंडाचा सामना करावा लागणार आहे. कोचिंग सेंटरकडून नियमांचे एकदा उल्लंघन झाल्यास पंचवीस हजार रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. जर पुन्हा नियमांचं उल्लंघन केल्यास एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. त्यानंतरही नियम पाळले गेले नाहीत तर कोचिंग क्लासेसची मान्यता रद्द होऊ शकते. नियमावलीतील व्याख्येनुसार 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जिथे शिक्षण दिले जाते त्या जागेला कोचिंग क्लास समजले जाईल.


तर 10 दिवसांमध्ये फी माघारी -


नव्या नियमांनुसार, एखाद्या कोर्सदरम्यान कोचिंग सेंटरला फी वाढवता येणार नाही. जर एखाद्या विद्यार्थ्याने पूर्ण पैसे भरूनही कोर्स अर्धवट सोडण्यासाठी अर्ज केला, तर कोर्सच्या उर्वरित कालावधीचे पैसे परत करावे लागतील. हॉस्टल आणि मेस फी देखील परताव्यात समाविष्ट केली जाईल. दहा दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना रक्कम माघारी करावी लागेल. 


पाच तासांपेक्षा जास्त क्लास नाही - 


शाळा, कॉलेज अथवा एखाद्या संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वेळेत कोणत्याही परिस्थितीत कोचिंग क्लासेस घेण्यात येणार नाहीत. त्याशिवाय एका दिवसांत पाच तासांपेक्षा जास्त क्लास चालणार नाही.  सकाळी लवकर आणि रात्री उशिरा क्लासेस घेता येणार नाहीत. विद्यार्थी आणि शिक्षकांना साप्ताहिक सुट्टी द्यावी लागेल.  


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI