NEET UG Results 2023: नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून NEET UG परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.  उमेदवार NEET च्या अधिकृत संकेतस्थळावर neet.nta.nic.in निकाल पाहू शकतात.  नीट यूजीची परीक्षा 7 मे 2023 रोजी घेण्यात आली होती. आज 13 जून रोजी निकाल जाहीर झालाय. तामिळनाडूच्या प्रबंजन जे आणि बोरा वरुण यांनी प्रथम क्रमांक पटकावलाय. नीट यूजीसाठी 2087462 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. 499 शहरातील 4097 केंद्रावर परीक्षा पार पाडली. 14 परीक्षा केंद्र देशाबाहेरही होते.  मराठी, हिंदी, गुजरातीसह 13 भाषांमध्ये नीट परीक्षा पार पडली होती.   


एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीयुएम, बीएसएमएस या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट युजी 2023 परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. तामिळनाडूतील प्रबंजन जे आणि आंध्र प्रदेशातील बोरा वरुण चक्रवर्ती यांनी NEET परीक्षेत 99.99 टक्के गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले आहे. तर महाराष्ट्रातून श्रीनिकेत रवी याने पहिला क्रमांक पटकावला आहे तर देशातून सातव्या क्रमांकावर आहे. 


20,38,596 विद्यार्थ्यांनी देशभरातून ही परीक्षा दिली होती. त्यातील 1145976 विद्यार्थी हे पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहे. यामध्ये सर्वाधिक उत्तर प्रदेश राज्याचे 1,39,961 विद्यार्थी परीक्षेच्या निकालानंतर पुढील प्रवेशासाठी पात्र ठरले आहे, त्यानंतर महाराष्ट्रचे 1,31,008 विद्यार्थी आणि राजस्थान राज्यातील 1,00,316 विद्यार्थी हे सर्वाधिक पात्र ठरले आहे. पुढील प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 720 पैकी 137 गुण (50 परसेन्टाईल ) आवश्यक आहे. तर ओबीसी, एससी ,एसटी या प्रवर्गातील उमेदवारांना 720 पैकी 107 गुण (40 परसेन्टाईल )आवश्यक आहे.


NEET UG result 2023 : Top 10 मुलांमध्ये टॉप 10 कोण ??


1. प्रबंजन जे


2. बोरा वरुण


3. कौत्सुव बुरी


4. ध्रुव आडवाणी


5. सूर्या सिद्धार्थ एन


6. श्रीनिकेत रवी


7. स्वयम शक्ती त्रिपाठी


8. वरुण एस


9. पार्थ खंडेलवाल


10. सयान प्रधान  


NEET UG result 2023: Top 10 मुलींमध्ये टॉप 10 कोण ?


1.प्रांजल अग्रवाल


2. अशिका अग्रवाल


3. आर्या आर एस


4. मीमांशा मौन


5.सुमेगा सिन्हा


6.KANI YASASRI


7.BAREERA ALI


8.रिधी वाजरिंगकर


9.कवलकुंतला प्राणथी रेड्डी


10. जागृत्ती बोदेदुला


NEET UG निकाल 2023 तपासण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी, उमेदवारांना नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) neet.nta.nic.in च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. जिथे उमेदवार अॅप्लीकेशन नंबर आणि बर्थ डेटच्या मदतीनं लॉग इन करून त्यांचा निकाल पाहू शकतील.


निकाल जाहीर झाल्यानंतर कसा पाहाल? 



  • आज NEET UG परीक्षेचा निकाल जाहीर केला जाऊ शकतो. 

  • निकाल जाहीर झाल्यानंतर तुम्ही नीटची अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in वर जाऊन निकाल पाहू शकता. 

  • निकाल पाहण्यासाठी सर्वात आधी neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या. 

  • येथे होमपेजवर NEET UG 2023 Result नावाची लिंक असेल, त्यावर क्लिक करा. 

  • नवीन पेज ओपन होईल. या पेजवर तुम्हाला तुमचा अॅप्लीकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकावी लागेल. 

  • डिटेल्स टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा. 

  • तुमचा निकाल तुमच्या स्क्रिनवर दिसेल. 

  • निकाल पाहिल्यानंतर बाजुला असलेल्या प्रिंट पर्यायावर क्लिक करुन तुम्ही प्रिंट काढू शकता.










Education Loan Information:

Calculate Education Loan EMI