NEET UG Exam 2022 : नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच NEET ची परीक्षा आज 17 जुलै रोजी होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) या परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षेपूर्वी NTA कडून NEET उमेदवारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. neet.nta.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवर जारी केलेल्या नोटीसद्वारे, NTA ने परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी पाळावयाच्या  मार्गदर्शक तत्त्वांबद्दल माहिती दिली आहे. NTA ने उमेदवारांसाठी neet.nta.nic.in वर NEET UG 2022 प्रवेशपत्र जारी केले आहे. दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांपर्यंत नीटची परीक्षा पार पडेल.  


यूजी नीट (NEET-UG 2022) परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. या परीक्षेचे आयोजन 13 भाषांमध्ये केले जाणार आहे. यामध्ये इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेचा समावेश आहे. या शिवाय भारतात वापरल्या जाणाऱ्या आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, मल्याळम, ओडिसा, पंजाबी, तामिळ आणि तेलगु भाषेत देखील परीक्षा होणार आहे. 


मार्गदर्शक तत्त्वे 



  • परीक्षेला बसणारे उमेदवार कॅज्युअल कपडे घालू शकतात.

  • विद्यार्थी चप्पल घालू शकतात. परंतु, विद्यार्थ्यांनी परिक्षेला बसताना बूट घालणे टाळावे.

  • परीक्षा केंद्रात पारंपारिक कपडे परिधान करण्यास मनाई आहे.

  • परीक्षेच्या वेळेच्या दोन तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे.

  • परीक्षा केंद्रावर उमेदवारांचे बायोमेट्रिक्स तपासले जाईल. त्यामुळे त्यांनी हलके कपडे परिधान करून केंद्रावर पोहोचावे जेणेकरून वेळ वाया जाणार नाही.

  • परीक्षेसाठी उमेदवारांनी निळ्या किंवा काळा बॉल पेन सोबत बाळगणे आवश्यक आहे.

  • उमेदवारांनी NEET UG 2022 प्रवेशपत्र स्व-घोषणापत्र आणि हमीपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. 

  • उमेदवारांना एक पारदर्शक पाण्याची बाटली आणि हँड सॅनिटायझरची 50 मिलीची बाटली बाळगण्याची परवानगी आहे.

  • उमेदवारांना प्रवेशपत्रावर लावण्यासाठी पोस्टकार्ड आकाराचा फोटो किंवा एखादा अतिरिक्त फोटो घेऊन जाण्यास परवानगी आहे.

  • धार्मिक आणि सांस्कृतिक श्रद्धेच्या वस्तू परीक्षा केंद्रावर नेण्यास मनाई आहे. 


प्रवेशपत्र 'असं' डाउनलोड करा 



  • अधिकृत वेबसाइटला भेट द्या - neet.nta.nic.in.

  • त्यानंतर NEET-UG 2022 अॅडमिट कार्ड लिंकवर क्लिक करा.

  • तुमचा अर्ज क्रमांक किंवा इतर आवश्यक तपशीलांसह लॉग इन करा.

  • अॅडमिट कार्ड डाउनलोड करा आणि प्रिंट आउट काढा.


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI