NEET UG Result 2022 : नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अंडर ग्रॅज्युएट 2022 (NEET UG Result 2022) चा निकाल आज म्हणजेच, 7 सप्टेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. अधिकृत वेबसाइट nta.nic.in वर निकाल जाहीर केला जाणार आहे. 


NEET UG निकाल 2022 तपासण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांना नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) neet.nta.nic.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. जिथे उमेदवार अॅप्लीकेशन नंबर आणि बर्थ डेटच्या मदतीनं लॉग इन करून त्यांचा निकाल पाहू शकतील. दरम्यान, नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट ग्रॅज्युएट म्हणजेच, NEET UG 2022 परीक्षा 17 जुलै रोजी घेण्यात आली होती, एकूण 18,72,343 उमेदवारांनी परीक्षा दिली होती.  


NEET-UG 2022 ची परीक्षा 17 जुलै रोजी झाली होती. या परीक्षेला 18 लाख 72 हजार 342 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. NEET परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. ही परीक्षा भारतातील 483 केंद्रांवर आणि 14 परदेशी शहरांमधील 3570 केंद्रांवर घेण्यात आली होती. परदेशात, परीक्षा अबू धाबी, बँकॉक, कोलंबो, दोहा, काठमांडू, क्वालालंपूर, मनामा, मस्कत, रियाध, शारजा, सिंगापूर, दुबई आणि कुवेत येथे घेण्यात आली होती.


NEET-UG 2022 चा निकाल कसा पाहाल? 



  • सर्वात आधी, उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट nta.nic.in वर भेट द्यावी.

  • होम पेजवर दिलेल्या NEET UG निकाल 2022 च्या लिंकवर क्लिक करा. 

  • तिथे मागितलेली माहिती सबमिट करा. (रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड इत्यादी)

  • निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

  • तुम्ही डाऊनलोड करुन निकालाची प्रिटंही काढू शकता. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


JEE Main 2022 Paper 2 Result : जेईई मेन 2022 पेपर 2 चा निकाल जाहीर, येथे चेक करा


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI