NEET-PG Exam Postponed : रविवारी होणारी नीट पीजी परीक्षा (NEET-PG) पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय आरोग्य मंत्रालयाने घेतला आहे. नीट पीजी (NEET-PG Candidates) परीक्षार्थींसाठी मोठी बातमी आहे. उद्या नीट पीजी परीक्षा पार पडणार होती, मात्र आता  उद्याची परीक्षा होणार नाही. नीट परीक्षेचा मुद्दा गेल्या बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. अलिकडेच नीट परीक्षेमध्ये घोळ झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर नीट पीजी परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत शिक्षण विभागाने रविवारी होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलली आहे.


नीट पीजी परीक्षा पुढे ढकलली


खबरदारीचा उपाय म्हणून नीट पीजी परीक्षा NEET-PG पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे नीट पीजी परीक्षा उद्या होणार नाही. नीट पीजी परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली. परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल, अशई माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे.


नीट पीजी परीक्षा रविवारी परीक्षा होणार नाही






मेडिकल प्रवेश परीक्षेबाबत आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय


आरोग्य मंत्रालयाने याबाबत अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करताना म्हटलं आहे की, काही स्पर्धात्मक परीक्षांमध्ये घोळ झाल्याच्या आरोपांच्या अलीकडील घटना लक्षात घेऊन, आरोग्य मंत्रालयाने वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय परीक्षा मंडळाद्वारे आयोजित केलेल्या NEET-PG प्रवेश परीक्षेच्या प्रक्रियेच्या मजबूततेचे सखोल मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, खबरदारीचा उपाय म्हणून उद्या म्हणजेच 23 जून 2024 रोजी होणारी NEET-PG प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेची नवीन तारीख लवकरात लवकर कळवण्यात येईल. विद्यार्थ्यांना झालेल्या गैरसोयीबद्दल आरोग्य मंत्रालय मनापासून दिलगीर आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि परीक्षा प्रक्रियेचे पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.


 




NTA DG सुबोध कुमार यांची हकालपट्टी 


NEET परीक्षेत हेराफेरी आणि पेपर लीक प्रकरणी कारवाई करत केंद्र सरकारने मोठी कारवाई करत NTA DG सुबोध कुमार यांना पदावरून हटवलं आहे. रविवार, 23 जून रोजी होणारी NEET-PG प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेची नवीन तारीख लवकरच कळवण्यात येईल, असंही आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.


पेपर लीक प्रकरणी सरकारची मोठी कारवाई






 


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI