NBE To Release NEET PG 2024 Admit Card Today नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन मेडिकल सायन्सकडून नीट पीजी परीक्षा घेतली जाते. या नीट पीजी परीक्षेची प्रवेशपत्र आज जारी केली जाणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी नीट पीजी परीक्षेसाठी अर्ज केला आहे ते एनबीईच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात. नीट परीक्षेची प्रवेशपत्र जारी झाल्यानंतर विद्यार्थी  nbe.edu.in या वेबसाईटवरुन प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात. यासह इतर माहिती देखील मिळवू  शकतात.  विद्यार्थ्यांना natboard.edu.in. या वेबसाईटवर देखील प्रवेशपत्र उपलब्ध होतील. नीट पीजी परीक्षेचं आयोजन देशभरात 23 जून रोजी केलं जाणार आहे.  


फोनवर माहिती मिळणार


नीट पीजी परीक्षा 2024 साठी प्रवेशपत्र जारी होताच विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर मेसेज  आणि ईमेलवर देखील माहिती दिली जाार आहे. एनबीईएमएसच्या वेबसाईटवरुन देखील विद्यारत्यांना प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासंदर्भात माहिती मिळू शकते. विद्यार्थ्यांना पोस्टानं किंवा ईमेलद्वारे प्रवेशपत्र दिली जाणार नाहीत. त्यांना अधिकृत वेबसाईटवरुन ते डाऊनलोड करुन प्रिट काढून घ्यावी लागेल.  


प्रवेशपत्र डाऊनलोड कसं कराल? 


स्टेप 1 : नीट पीजी परीक्षा 2024 चं प्रवेशपत्र जारी झाल्यानंतर ते डाऊनलोड करण्यासाठी पहिल्यांदा अधिकृत वेबसाईट natboard.edu.in ला भेट द्या. 


स्टेप 2 : इथं तुम्हाला NEET PG 2024 Admit Card अशा नावाची लिंक असेल. 


स्टेप 3 : या लिंकवर क्लिक करा, यानंतर एक नवीन पेज खुलं होईल. तिथं तुम्हाला तुमच्या लॉगिन डिटेल्स नोंदवाव्या लागतील.
 
स्टेप 4 : लॉगिन डिटेल्स नोंदवल्यानंतर तुम्हाला प्रवेशपत्र कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसेल


स्टेप  5 : प्रवेशपत्रावरील माहिती घ्या आणि आवश्यक असल्यास प्रिंट काढून ठेवा


स्टेप 6 : प्रवेशपत्राची प्रिंट जपून ठेवा, पुढील कामांसाठी ती उपयोगी पडेल.  


प्रवेशपत्र आणि परीक्षेसंदर्भातील अधिक माहितीसाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाईटला भेट देणं आवश्यक आहे.  


मॉक टेस्ट लिंक सक्रीय


मुख्य परीक्षा देण्यापूर्वी नीट परीक्षा देणारे विद्यार्थी मॉक टेस्ट लिंकच्या माध्यमातून सराव करु शकतात. ही सुविधा वेबसाईटवर सक्रीय करण्यात आली आहे. नीट परीक्षा देणारे विदियार्थी मॉक टेस्टच्या माध्यमातून सराव करु शकतात. विद्यार्थ्यांना याद्वारे ज्या ज्या गोष्टींमध्ये चुका होत आहेत त्या दुरुस्त करता येतील.   


इतर बातम्या :


T20 World Cup 2024: वेस्ट इंडिजने अफगाणिस्तानचं कंबरडं मोडलं; सुपर 8 च्या फेरीआधी मैदान गाजवलं, सलग चौथ्या विजयाची नोंद


Sadashiv Lokhande : राम मंदिराबाबत माझ्या वक्तव्याचा विपर्यास, सदाशिव लोखंडेंचं स्पष्टीकरण


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI