NEET 2020 result date:  राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) यूजी 2020 चा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे.  ntaneet.nic.in या अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर झाला आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला अॅप्लिकेशन नंबर, जन्मतारिख आणि सेक्युरिटी पिन आवश्यक आहे. नीट परीक्षेचा निकाल घोषित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राष्ट्रीय चाचणी एजन्सीला दिले होते. त्यानुसार आज या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यासंदर्भात केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी 12 ऑक्टोबर रोजी ट्वीट करत देखील माहिती दिली होती.


NEET Result 2020: रिझल्ट असा चेक करा


नीट 2020 परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी हे करा 
- सर्वात आधी अधिकृत वेबसाईट ntaneet.nic.in वर या
- यानंतर रिझल्ट असं लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा
- त्यानंतर अॅप्लिकेशन नंबर, जन्मतारिख आणि सेक्युरिटी पिन टाकून सबमिट करा
- नंतर नीट 2020 रिझल्ट आपल्या स्क्रिनवर दिसेल.
- आपला रिझल्ट डाऊनलोड करा किंवा प्रिंट काढून घ्या.


12 ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टानं कोविड -19 किंवा कंटेन्मेंट झोनमध्ये अडकल्यामुळे परीक्षेला हजर होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना 14 ऑक्टोबरला परीक्षेला हजर राहण्याची संधी द्या, असं म्हटलं होतं. तसंच या परीक्षेचा निकाल 16 ऑक्टोबरला घोषित करावा असंही कोर्टानं म्हटलं होतं.


कोविडमुळं परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनी दिली एक संधी


सुप्रीम कोर्टानं 13 सप्टेंबर रोजी परीक्षा न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांना 14 ऑक्टोबर रोजी  एकदा परीक्षा देण्याचा निर्णय दिला होता.  देशात नीट परीक्षा 13 सप्टेंबर रोजी 3,843 परीक्षा केंद्रांवर आयोजित केली होती. जवळपास 90 टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. एकूण 15.97 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं. मात्र काही विद्यार्थी कोरोना आणि कन्टेन्मेंट झोनमध्ये अडकल्यामुळं परीक्षा देऊ शकले नव्हते. त्यांना 14 ऑक्टोबर रोजी एक संधी दिली होती.


ज्या विद्यार्थ्यांनी NEET UG-2020  परीक्षा दिली होती ते एनटीएच्या ऑफिशियल वेबसाईट nta.ac.in आणि ntaneet.nic.in वर निकाल चेक करु शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर आणि जन्मतारीख आवश्यक असणार आहे.


लॉकडाऊनमुळं लांबलेली नीट 2020 ची परीक्षा 13 सप्टेंबर रोजी पार पडली होती.  कोरोनाची पार्श्वभूमी असल्याने शिक्षण विभागाकडून योग्य ती खबरदारी घेत ही परीक्षा घेतली होती.   देशभरातील जवळपास 15 लाख विद्यार्थी 'नीट' मेडिकल प्रवेश परीक्षेला बसले होते.  महाराष्ट्रातील 2,28,214 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.


नीट परीक्षेसाठी देशात 15.97 लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची संख्या 2546 वरुन वाढवत 3843 इतकी केली होती. तर प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांची संख्या 24 वरुन 12 करण्यात आली होती.


ही परीक्षा पुढं ढकलण्यासाठी पश्चिम बंगाल, पंजाब, महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड आणि  झारखंड राज्यातील सहा मंत्र्यांनी याचिका दाखल केली होती मात्र सुप्रीम कोर्टाने ती याचिका फेटाळून लावली होती. प्रत्येकवर्षी ही परीक्षा मे महिन्यात पार पडते. पण लॉकडाऊनळं यंदा ही परीक्षा पुढं ढकलण्यात आली.  यावरून अनेकदा राजकारण ही रंगलं, शेवटी न्यायालयाने परीक्षा घेण्यावर शिक्कामोर्तब केला.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI