NEET 2022 Date : नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच, NEET UG 2022 परीक्षेसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने अधिकृत वेबसाइट nta.ac.in आणि neet.nta.nic.in वर NEET अधिसूचना जारी केली आहे. NEET परीक्षा 17 जुलै रोजी होणार आहे. दुपारी 2 ते 5:30 या वेळेत परीक्षा होणार आहे. या परीक्षेची नोंदणी सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र विद्यार्थी 6 मे रोजी रात्री 11:50 पर्यंत या परीक्षेसाठी नोंदणी करू शकतात. दरम्यान, नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख जाहीर केलेली नाही. परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 मे 2022 आहे.
यूजी नीट परीक्षा (NEET-UG 2022) परीक्षेचे आयोजन ऑफलाईन करण्यात येणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या परीक्षेचे आयोजन 13 भाषांमध्ये केले जाणार आहे. यामध्ये इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेचा समावेश आहे. या शिवाय भारतात वापरल्या जाणाऱ्या आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, मल्याळम, ओडिसा, पंजाबी, तामिळ आणि तेलगु भाषेत देखील परीक्षा होणार आहे.
31 डिसेंबर 2022 पर्यंत 17 वर्षे पूर्ण झालेले सर्व विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहे. 2021 मध्ये 16,14,777 विद्यार्थ्यांनी नीट-यूजी परीक्षा (NEET-UG exam) परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी 95.6 टक्के विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थ्यांपैकी 8,70,074 म्हणजे 56.04 टक्के विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले.
कसं कराल रजिस्ट्रेशन?
- सर्वात आधी आफिशिअल वेबसाईट neet.nta.nic.in वर भेट द्या.
- वेबसाईटवर देण्यात आलेल्या Registration for NEET(UG)-2022 या लिंकवर क्लिक करा.
- आता नाव, आई-वडिलांचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि इतर माहिती सबमिट करुन लॉग इन करा.
- आता पुन्हा पेजवर जाऊन लॉग इन करा.
- लॉग इन केल्यानंतर अॅप्लिकेशन फॉर्म भरा.
- फोटो आणि तुमची सही अपलोड करा.
- अॅप्लिकेशन फी सबमिट करा.
- सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अॅप्लिकेशनची प्रिंट घ्या.
भारतातील पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी NEET ही एकमेव प्रवेश परीक्षा आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी इच्छुक असणारे तब्बल 15 लाखांहून अधिक विद्यार्थी दरवर्षी परीक्षेला बसतात. नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) या परीक्षेसाठी वयोमर्यादा हटवल्यानंतर, यावेळी चाचणीसाठी अर्जदारांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
JEE 2022 Dates : जेईई मेन 2022 परीक्षा पुढे ढकलली, 'असं' आहे नवं वेळापत्रक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI