FYJC Online Admission : मुंबईत (Mumbai) अकरावी ऑनलाईन प्रवेशाची (FYJC Online Admission) पहिली गुणवत्ता यादी (Merit List) जाहीर झाली. मात्र, या पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये फक्त 58 टक्के विद्यार्थ्यांना कॉलेज (College) मिळाले आहेत. तर जवळपास 1 लाख विद्यार्थी (Students) हे कॉलेजच्या प्रतीक्षेत आहेत. प्रवेश अर्ज भरताना कॉलेजचा पसंती क्रमांक टाकताना केलेल्या चुका आणि मुंबईतील नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्याचा अट्टाहास यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत कॉलेज मिळाले नसल्याचा समोर आले आहे. त्यामुळे आता येणाऱ्या दुसरी फेरीत तरी कॉलेज मिळावं त्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रयत्न सुरु आहेत.


सीबीएसई बोर्डाच्या निकालामुळे रखडलेली अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरु जरी झाली तरी पहिल्या फेरीनंतर अजूनही 42 टक्के विद्यार्थ्यांना मुंबईत कॉलेज मिळालेले नाहीत. मुंबईतील नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असा विचार करत विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत कॉलेजचे पसंती क्रमांक दिले आणि या पहिल्या फेरीनंतर नामांकित कॉलेजचे कट ऑफ हे यावेळी सुद्धा नव्वदी पार गेले. त्यामुळे 90 टक्के पेक्षा कमी गुण असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत कॉलेज मिळालेच नाहीत.


एकूण अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी नोंदणी केलेले विद्यार्थी - 2,37,268 


पहिल्या फेरीत पसंती क्रमांकानुसार कॉलेज मिळालेले विद्यार्थी - 1,39,651 (एकूण संख्येच्या 58%)


अद्याप कॉलेजच न मिळालेले विद्यार्थी - 97,617


आता ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत कॉलेज मिळाले आहेत त्यात सुद्धा अनेक विद्यार्थी प्रवेश न घेता पुढच्या फेरीत नामांकित कॉलेज मिळेल या आशेवर असल्याने प्रवेश निश्चित करत नाहीत. त्यामुळे दुसऱ्या फेरीच्या प्रतीक्षेत एक लाखापेक्षा अधिक विद्यार्थी नामांकित कॉलेजची मिळवण्याची प्रतीक्षा करतील


नामांकित कॉलेजचा जरी हट्ट विद्यार्थ्यांकडून केला जात असला तरी नामांकित कॉलेजची कट ऑफ नव्वदी पार आहेत. शिवाय जागा सुद्धा प्रवेशासाठी मोजक्याच आहेत.


मुंबईतील नामांकित कॉलेजच्या कट ऑफवर नजर टाकूया 


एच आर कॉलेज, चर्चगेट
कॉमर्स - 93%


एन एम कॉलेज 
कॉमर्स - 93.6%


सेंट झेविअर्स कॉलेज
आर्टस् - 94.2%
सायन्स -89.6%


रुईया कॉलेज
आर्टस् - 91.4%
सायन्स- 92.4%


मिठीबाई कॉलेज
आर्टस् - 87.6%
कॉमर्स - 90.8%
सायन्स- 89%


पोदार कॉलेज
कॉमर्स - 92.4%


के सी कॉलेज
आर्टस् - 85.6%
कॉमर्स - 90.8%
सायन्स - 88.2%


जय हिंद कॉलेज
आर्टस् - 90.2 %
कॉमर्स - 91%
सायन्स - 87.4% 


कॉलेज निवडताना विद्यार्थ्यांनी काय करावं?
आता तुम्ही म्हणाल मग विद्यार्थ्यांनी कॉलेज निवडताना नेमकं काय करायचं? शिक्षण तज्ञांच्या मते विद्यार्थ्यांनी पसंती क्रमांक देताना कॉलेज कट ऑफ पाहावे ज्याने एखाद्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार की नाही? याचा अंदाज येईल. शिवाय आपल्या जवळच कॉलेज निवडण्यासंदर्भात विचार करावा जेणेकरुन विद्यार्थ्यांचा अधिकाधिक वेळ वाचेल आणि तो वेळ अभ्यासासाठी देता येईल.


एकतर प्रवेश प्रक्रिया उशिराने सुरु झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो नामांकित कॉलेजच्या अट्टहास न करता, कॉलेजचा कट ऑफ बघा, आपल्या जवळचे कॉलेज निवडा, नुसतेच कॉलेज निवडू ठेवू नका, तर पुढच्या फेरीत ते मर्यादित वेळेत निश्चित करुन अकरावी-बारावीच्या अभ्यासाला लागा.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI