Mumbai University Winter Session Exams : मुंबई विद्यापीठ (Mumbai University) अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांच्या हिवाळी सत्र परीक्षा (Winter Session Exams) या दिवाळीनंतर (Diwali 2022) घेण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेण्यात आला. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर परीक्षा (Exams) तयारीसाठी कमी वेळ मिळाल्या कारणाने विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या आधी परीक्षा घेण्यास विरोध दर्शवला होता. त्यानंतर सुधारित परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत
 
मुंबई विद्यापीठानं 2022 चे  द्वितीय सत्र म्हणजे,  हिवाळी  सत्र परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर केल्या असून या परीक्षा 4 नोव्हेंबर 2022 पासून सुरु होत आहेत. यातील 2022-23 या शैक्षणिक वर्षाच्या तृतीय वर्ष बीए (BA) आणि बीएस्सी (Bsc) सत्र 5 च्या परीक्षा 4 नोव्हेंबर तर तृतीय वर्ष बीकॉम सत्र 5 ची परीक्षा 18 नोव्हेंबर 2022 पासून सुरु होत आहेत. हिवाळी सत्राच्या सर्व विद्याशाखेच्या नियमित व बॅकलॉगच्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.


379 परीक्षेच्या तारखा जाहीर


विद्यापीठ दरवर्षी चार विद्याशाखेच्या 450 पेक्षा जास्त परीक्षा घेत असते. विद्यापीठाने 2022 च्या  हिवाळी सत्राच्या मानव्यविद्याशाखेच्या एकूण 80 परीक्षा, वाणिज्य विद्याशाखेच्या 96 परीक्षा, विज्ञान विद्याशाखेच्या 94 परीक्षा तर आंतर विद्याशाखेच्या 109 अशा 379 परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. तंत्रज्ञान विद्याशाखेच्या आणि दूर-मुक्त अध्ययन संस्थेच्या परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील. सर्व विद्याशाखेच्या सर्व परीक्षेच्या तारखेचे परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI