औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा ( MPSC ) मुख्य परीक्षेत उमेदवाराने ब्लू टूथ इयरफोनचा वापर केल्याची धक्कादायक घडना समोर आलीय. औरंगाबादमधील मौलाना आझाद कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर हा प्रकार समोर आला आहे. सकाळच्या सत्रातील पहिला पेपर सुरू असताना हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इयरफोनचा वापर करणाऱ्या उमेदवाराविरोधात केंद्रप्रमुखाच्या तक्रारीवरून सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारीनंतर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन नवनाथ बागलाने असे गुन्हा दाखल झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.  


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथील प्रा. डॉ. सय्यद अथरोद्दीन मैनोद्दीन कादरी हे मौलाना आझाद कॉलेजच्या एमपीएससी परीक्षेचे केंद्रप्रमुख आहेत. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 चा पहिला पेपर आज सकाळी 9 वाजता होता. त्यासाठी विद्यार्थ्यांना फ्रिस्क्रिन एजन्सीने तपासून परीक्षा केंद्रात सोडले. मोबाईल फोनसह इतर दुरसंचार साधने परीक्षा केंद्रात घेवून जाणे, बाळगणे यास बंदी आहे. तरी देखील सचिन हा आपल्यासोबत ब्लू टूथ इयरफोन घेऊन परीक्षा हॉलमध्ये प्रवेश केला. परीक्षा हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यामुळे ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली. त्यामुळे हा प्रकार पुढे आला. 


दरम्यान, या सर्व प्रकारानंतर एमपीएससीने ट्विटरवरून माहिती दिली आहे. "राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 साठी औरंगाबाद येथे परीक्षेच्या वेळी ब्लू टूथ जवळ बाळगल्याबद्दल सचिन नवनाथ बागलाने या उमेदवारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहीती एमपीएससीच्या ट्विटर हॅण्डलवरूनही देण्यात आली आहे.  






महत्वाच्या बातम्या


Republic Day: इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे, भारतासोबत संबंध भक्कम करण्यावर भर


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI