Dharashiv News : विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) महायुतीला मोठा यश मिळालं आहे. त्यामुळं महायुती पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्री कोण होणार? तसेच मंत्रीपदाची लॉटरी कोणा कोणाला लागणार याची मात्र, सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. दरम्यान, धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील चार मतदारसंघापैकी दोन ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत, तर दोन जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. परांडा विधानसभा मतदारसंघातून पुन्हा तानाजी सावंत (Tanaji Sawant) विजयी झालेत, तर तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून राणाजगजीतसिंह पाटील ( Rana Jagjitsinh Patil) हे देखील पुन्हा विजयी झाले आहे. त्यामुळं हे दोन्ही नेते मंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची माहिती मिळाली आहे. 


धाराशिव जिल्ह्यातील महायुतीचे दोन आमदार मंत्री पदाच्या शर्यतीत आहेत. परंडा येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत पुन्हा मंत्री पदाच्या शर्यतीत आहेत. तर तुळजापूर येथील भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील देखील मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. राणाजगजीतसिंह पाटील हे दुसऱ्यांदा भाजपकडून आमदार झाले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघापैकी दोन मतदारसंघावर महायुतीचा विजय झाला आहे. तर दोन जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर तानाजी सावंत यांनी घेतली एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. तर राणा पाटीलही मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट घेतली आहे. 


तानाजीरावांना आमदार करा मी नामदार करतो, मुख्यमंत्र्यांनी दिला होता शब्द 


तानाजी सावंत यांच्या निवडून येण्याने धाराशिव जिल्ह्याला शिवसेनेकडून पुन्हा मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावंत यांच्या प्रचारसभेत बोलताना तुम्ही तानाजीरावांना आमदार करा मी नामदार करतो हा शब्द दिला होता. धाराशिव जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एकमेव आमदार निवडून आला आहे. परंडा विधानसभा मतदारसंघात तानाजी सावंत यांचा 1500 मतांनी विजय झाला आहे. तानाजी सावंत यांच्याकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राहुल मोटे यांचा पराभव केला आहे. 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI