Maharashtra SSC Result 2023 : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल (SSC Result) जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. यावर्षी देखील निकालात मुलींनी बाजी मारली आहे. दरवर्षी प्रमाणे कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 98.11 टक्के निकाल तर सर्वात कमी 92.05 टक्के निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. त्यात महत्वाचं म्हणजे लातूर विभागातील 108 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. मात्र याच निकालासंदर्भात काही आक्षेप असेल किंवा गुणपडताळणीसाठी अर्ज करायचे असेल तर अर्ज करण्याची मुदत 3 जून सोमवार ते 12 जून पर्यंत आहे.

Continues below advertisement

अर्ज कुठे आणि कसा कराल?

दहावीच्या निकाल जाहीर झाला आहे. त्यात अनेक विद्यार्थ्यांना निकालाबाबत अनेक अडचणी किंवा आक्षेप असल्यास तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणीसाठी, उत्तरपत्रिका प्रत मिळवण्यासाठी, पुनर्मूल्यांकन यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर verification.mh-ssc.ac.in अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज करताना सगळी माहिती, अटी शर्ती आणि सुचना वेबसाईटवर देण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेसाठी ऑनलाईनच पैसे भरावे लागणार आहेत. यासाठी आवश्यक शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Debit Card/Credit Card/UPI/Net Banking) भरता येईल.

- गुणपडताळणीसाठी अर्ज करावयाची मुदत शनिवार 3 जून ते सोमवार 12 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहिल. गुणपडताळणीसाठी प्रति विषय रु.50/- शुल्क ऑनलाईन पद्धतीने मंडळाकडे जमा करावे लागेल.

Continues below advertisement

- मार्च 2023 च्या परीक्षेतील विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स कॉपी मागणीसाठी 1) ई-मेलद्वारे/संकेतस्थळावरुन 2) स्वत: जाऊन घेणे आणि 3) पोस्टाने यापैकी एका पर्यायाची निवड करता येईल आणि त्यांनी मागणी केलेल्या पद्धतीने झेरॉक्स कॉपी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. झेरॉक्स कॉपीसाठी प्रति विषय 400 रुपये शुल्क भरावं लागणार आहे. 

उत्तर पत्रिका पुनर्मूल्यांकनासाठी (re-valuation) काय करावं?

मार्च 2023 च्या परीक्षेतील उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी सुरुवातीला उत्तरपत्रिकेची झेरॉक्स कॉपी घेणे अनिवार्य आहे. झेरॉक्स कॉपी मिळाल्याच्या दिवसापासून त्यापुढील पाच कार्यालयीन कामाच्या दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या प्रती विषय 300 रुपये शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहिल. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल आणि त्या अनुषंगिक येणारे प्रश्न यावर मार्गदर्शन करण्यासाठी मंडळामार्फत समुपदेशक नेमण्यात आले आहेत. ही सुविधा ऑनलाईन निकालाच्या दिवसापासून पुढे आठ दिवस सुरु राहणार असल्याचं शिक्षण मंडळातर्फे सांगण्यात आलं आहे. 

हेही वाचा


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI