MSBSHSE SSC Result 2024 मुंबई  : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE ) दहावीचा निकाल (SSC Result) लवकरच जाहीर करण्यात  येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दहावीचा निकाल 27 मे पर्यंत जाहीर होईल असं म्हटलंय. यामुळं दहावीच्या निकालाबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये निकालाची उत्सुकता निर्माण झाली आहे. बोर्डानं बारावीचा निकाल 21 मे रोजी  जाहीर करण्यात आला आहे. आता दहावीच्या निकालाची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. दहावीचे विद्यार्थी ऑनलाईन निकाल mahresult.nic.in या वेबसाईटवर पाहू शकतात. याशिवाय दहावीचा निकाल डिजीलॉकरवर देखील पाहता येणार आहे. 



महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीची परीक्षा 1  मार्च ते 6 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आली होती. आता विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागून राहिलेली आहे. महाराष्ट्रातील जवळपास 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. बोर्डाकडून येत्या काही दिवसांमध्ये दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थी बोर्डाच्या निकालांच्या वेबसाईटसह डिजीलॉकरवर देखील निकाल पाहू शकतात. 



डिजीलॉकरवर निकाल कसा पाहणार?  


स्टेप 1 : डिजीलॉकरच्या वेबसाईटला भेट द्या किंवा डिजीलॉकर अॅप तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड करा.


स्टेप 2 : महाराष्ट्र बोर्डाचा पर्याय निवडा आणि त्यानंतर दहावीचा निकाल हा पर्याय निवडा 


स्टेप 3 : आवश्यक असलेली माहिती भरा 


स्टेप 4 : तुम्हाला तुमचा निकाल उपलब्ध होईल. यानंतर तुम्ही निकालाची प्रत डाऊनलोड करु शकता. 



राज्यातील 16 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदण  केली होती. महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील वाढली आहे. दहावीचा निकाल येत्या काही दिवसांमध्ये जाहीर होणार असल्याचं स्पष्ट झाल्यानं विद्यार्थी आणि पालक निकालासाठी आतूर झाले आहेत. 



महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नऊ विभागीय मंडळाद्वारे कामकाज केलं जातं. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभागाद्वारे दहावी आणि बारावीच्या परीक्षा आयोजित करण्यात येतात.


अकरावीची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरु 


राज्यातील अकरावीच्याप्रवेशाची प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात आलेली आहे. केंद्रीय प्रवेश समितीद्वारे अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे आणि अमरावती या विभागात ऑनलाईन पद्धतीनं प्रक्रिया राबवण्यात येते.  राज्यातील इतर विभागात ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. 


संबंधित बातम्या: 


Maharashtra SSC Result 2024 : बारावीनंतर आता दहावीचा निकाल थोड्या दिवसात जाहीर होणार, विद्यार्थ्यांना निकाल कुठं पाहता येणार? जाणून घ्या


FYJC Admission : बारावीचा निकाल लागला, दहावीचा निकाल काही दिवसांवर, अकरावी प्रवेशाबाबत मोठी अपडेट 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI