मुंबई :  भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar)  यांनी 33 वर्षांनंतर म्हाडाचा ( MHADA ) भूखंड परत केलाय. या भूखंडावर अकादमी उभारली नसल्याने गावस्करांनी हा निर्णय घेतला. म्हाडानं क्रिकेटर सुनील गावस्करांना वांद्रे येथं 21 हजार 348 चौरस फुटांचा भूखंड भाडेतत्तवावर दिला आहे. इनडोअर क्रिकेट अकादमी सुरु करण्यासाठी 33 वर्षांपूर्वी ही जमीन गावस्करांना देण्यात आली होती. मात्र, अनेक वर्ष उलटूनही सुनील गावस्करांनी प्रशिक्षण संस्था सुरु न केल्यामुळं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावर आक्षेप घेतला होता. 


महाराष्ट्र हाउसिंग एजन्सी म्हणजे म्हाडाच्या एक अधिकऱ्यांनी बुधवारी सांगितले की, भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर  यांनी 33 वर्षांनी मुंबईतील क्रिकेट अकादमी बनवण्यासाठी देण्यात आलेला सरकारी भूखंड परत केला आहेय 1980 मध्ये सुनिल गावस्कर क्रिकेट फाऊंडेशन ट्रस्टला  (SGCFT) एक इनडोअर क्रिकेट अकादमी बनवण्यासाठी एक भूखंड देण्यात आला होता. परंतु  क्रिकेट अकादमी उभारु न शकल्याने 33 वर्षांनी भूखंड परत केला आह. 


म्हाडाने 2019 साली भूखंडावरील ताबा परत घेण्यासाठी आणि ट्रस्ट सोबत केलेला करार मागे घेण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, गावस्कर यांनी आठ महिन्यांच्या विचारानंतर महाविकासआघाडीशी चर्चा केल्यानंतर ही जागा म्हाडाला परत केली आहे. 


दरम्यान या अगोदर सुनील गावस्कर यांनी सचिन तेंडूलकरसह अकादमी डेव्हलप करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी संपर्क साधला होता. परंतु ही योजना यशस्वी झाली नाही.समोर आलेल्या माहितीनुसार सुनील गावस्कर यांनी म्हाडाची जमीन परत केली आहे.गावस्कर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित याची माहिती दिली आहे.  क्रिकेट अकादमी उभारु न शकल्याने  भूखंड परत करत असल्याचे ते म्हणाले आहे. 


सुनील गावस्कर यांनी देखील या वृत्तावर शिक्कामोर्तब केले आहे. सुनील गावस्कर म्हणाले की,क्रिकेट अकादमी सुरू करणे हे माझे स्वप्न होते. परंतु माझ्या व्यस्त वेळापत्रकानुसार ते मला शक्य नाही.त्यामुळे म्हाडान या जागेचा विकस केला पाहिजे. यसाठी जर कोणत्याही मदतीची गरज असल्यास मी मदतीसाठी तयार आहे