मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीनं दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बारावी आणि दहावीच्या परीक्षा झाल्या होत्या.  दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसह पालकांना देखील आता दोन्ही परीक्षांच्या निकालाचे वेध लागले आहेत. सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे.  बारावीचा निकाल येत्या आठवड्यात जाहीर होईल अशी माहिती आहे. तर दहावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटी जाहीर होऊ शकतो. 

Continues below advertisement

बारावीचा निकाल येत्या आठवड्यात

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून  फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. बारावीची परीक्षा नऊ विभागीय मंडळांतर्फे आयोजित करण्यात आली होती. बारावीचा निकाल तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात असून येत्या आठवड्यात जाहीर होऊ शकतो. 

दहावीचा निकाल कधी जाहीर होणार?

बारावीच्या परीक्षेचा निकाल येत्या आठवड्यात जाहीर करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमकि परीक्षा मंडळ मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात निकाल जाहीर करु शकते.  दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या उत्तर पत्रिका तपासणीचं काम बोर्डाकडून तयार झालं आहे. उत्तर पत्रिका तपासणीचं काम पूर्ण झालं असून आता निकालाच तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. 

Continues below advertisement

महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 2023-24 या शैक्षणिक वर्षात वाढली आहे.  दहावीला 16 लाख 9 हजार 444  विद्यार्थ्यांची नोंदणी केली जाणार आहे. दहावीची परीक्षा 1 ते 26 मार्च दरम्यान पार पडली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या  पुणे ,नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर , अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण नऊ विभागीय मंडळांतर्फे परीक्षेचं आयोजन केलं जातं. 

सीबीएसईचा निकाल जाहीर

केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच सीबीएसईकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल एकाच दिवशी जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळं सर्वाचं लक्ष महाराष्ट्र बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल कधी लागणार याकडे लागलं आहे. 

संबंधित बातम्या : 

RTE Admission : आरटीईच्या एक लाख जागांवरील प्रवेशासाठी नोंदणी कधी सुरु होणार? शालेय शिक्षण विभागाकडून मोठी अपडेट


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI