मुंबई : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल (Maharashtra HSC Result) लागला आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळासह विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत हा निकाल देण्यात येणार आहे. दरम्यान, या परीक्षेत यावर्षी कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागातील एकूण 97.51 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर मराठवाड्यातील लातूर आणि छत्रपती संभाजीनगर या विभागातील निकालदेखील 90 टक्क्यांचा वर लागला आहे. इयत्ता बारावीचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लीक करा.
संभाजीनगर, लातूर विभागाचा निकाल काय? (Marathwada HSC Result)
या वर्षी एकूण 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीची परीक्षा दिली होती. यातील 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी पास झाले आहेत. यावेळी मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर विभागातील एकूण 94.08 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर लातूर विभागाचा 92.36 टक्के निकाल लागला आहे.
यंदाही मुलींनीच मारली बाजी
यंदा इयत्ता बारावीचा एकूण निकाल हा 93.37 टक्के लागला आहे. दरवर्षी इयत्ता बारावीच्या निकालात मुलीच बाजी मारतात. यावेळीदेखील या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली असून मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे 95.44 टक्के आहे. तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे 91.60 टक्के आहे. म्हणजेच मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा 3.84 टक्क्यांनी जास्त आहे.
यावर्षी किती विद्यार्थी परीक्षेला बसले?
यंदाच्या बारावीच्या परीक्षेला राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण 14 लाख 33 हजार 371 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी साधारण 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यातील एकूण 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची ही टक्केवारी 93.37 टक्के आहे. नऊ विभागीय मंडळाचे निकाल
पुणे- 94.44 टक्के
नागपूर- 92.12 टक्के
छत्रपती संभाजीनगर- 94.08 टक्के
मुंबई- 91.95 टक्के
कोल्हापूर- 94.24 टक्के
अमरावती- 93 टक्के
नाशिक- 94.71 टक्के
लातूर- 92.36 टक्के
कोकण- 97.51 टक्के
हेही वाचा :
नागपुरात समोर आलं 'आरटीई रॅकेट', खोटी कागदपत्रं सादर करून मुलांना वेगवेगळ्या शाळांत प्रवेश!
अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी 24 मेपासून नोंदणी; कशा असतील प्रवेश फेऱ्या?
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI