नाशिक : सार्वजनिक आरोग्य विभागातील आयुक्तालय आरोग्य सेवा अंतर्गत गट ‘क’ व ‘ड’ पदभरती संदर्भात येत असलेल्या विविध शंका व उलट-सुलट बातम्यांबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी नाशिक येथे पत्रकार परिषद घेवून सर्व शंकाचे निरसन करण्याचा प्रयत्न केला.
कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आरोग्य विभागास 100% रिक्त पदे भरण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यास अनुसुरून आरोग्य विभागाने भरती प्रक्रिया राबवण्यासाठी मे. न्यास कम्युनिकेशन यांची नेमणूक केली आहे. शासनाच्या परवानगी नुसार गट क मधील 52 संवर्गातील 2739 रिक्त पदे भरण्यासाठी 5 ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यास अनुसुरून 405163 अर्ज प्राप्त झाले. याबाबतची परीक्षा मे. न्यास यांच्यामार्फत 24 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. सदरील भरती परीक्षा राज्य स्तरावरील 24 आणि मंडळ स्तरावरील 28 अशा एकूण 52 संवर्गांसाठी घेण्यात येत आहे.
राज्य स्तरावरील संवर्गाचे नेमणूक अधिकारी हे संबंधित सहसंचालक असून मंडळ स्तरावरील पदांचे नेमणूक अधिकारी 8 उप संचालक मंडळे आहेत. वरील परीक्षार्थींना प्रवेश पत्र 15 ऑक्टोबर संध्याकाळी 6 वाजेपासून देण्यास सुरुवात झाली असून आज सकाळी 10 वाजेपर्यंत 241590 उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड केले आहे. यापैकी 2869 उमेदवारांनी परीक्षेबाबत तक्रारी केल्या आहेत. उमेदवारांच्या तक्रारी प्रामुख्याने खालील स्वरूपाच्या आहेत.
1) उमेदवारांनी मागितलेल्या परीक्षा केंद्रापेक्षा वेगळे व दूरचे केंद्र देण्यात आले आहे.
वस्तुस्थिती :
उमेदवारास परीक्षा केंद्र देताना प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार करण्यात आला असून उमेदवाराचे पद ज्या नेमणूक अधिकाऱ्याचे अंतर्गत येते त्या विभागात त्यास परीक्षा केंद्र दिले आहे. उदा. उमेदवाराने अकोला विभागातील पदासाठी अर्ज केला असल्यास त्यास अकोला विभागातीलच परीक्षा केंद्र मिळेल. म्हणजेच उमेदवार ज्या विभागात नोकरी करू इच्छितो त्या विभागात त्याने परीक्षा देणे अपेक्षित आहे. ही अट ठेवली नाही तर कोणत्याही भागातील उमेदवार आपल्या गावी बसून राज्यातील इतर कोणत्याही भागासाठी अर्ज करतील आणि निवड झाल्यावर एक तर हजर होणार नाहीत किंवा हजर होऊन काम करणार नाहीत किंवा पहिल्या दिवसापासून बदली मागतील. याचा सर्वात जास्त दुष्परिणाम आदिवासी भागावर होईल.
2) उमेदवारांनी वेगवेगळ्या परीक्षांसाठी अर्ज केला आहे व फीस सुद्धा दिली आहे. मात्र, या सर्व पदांच्या परीक्षा एकाच वेळी होत आहेत. त्यामुळे उमेदवारास इतर ठिकाणी परीक्षा देता येणार नाही.
वस्तुस्थिती :
24 ऑक्टोबर रोजी होणारी परीक्षा 14 नेमणूक अधिकाऱ्यांच्या/कार्यालयांच्या अधिनस्त 52 संवर्गासाठी घेण्यात येत आहे. उमेदवारांनी एकाच पदासाठी वेगवेगळ्या नेमणूक अधिकाऱ्यांकडे/ कार्यालांकडे अर्ज केले आहेत. उदा. एका उमेदवाराने वाहन चालक पदासाठी उपसंचालक पुणे, नाशिक, अकोला येथे आणि सहसंचालक पुणे येथे अर्ज केले आहेत. या उमेदवारास सर्व परीक्षा देण्याची सोय करावयाची झाल्यास वाहन चालकाच्या प्रत्येक मंडळ व सहसंचालक कार्यालयाच्या परीक्षा वेगवेगळ्या 14 रविवारी घ्याव्या लागतील. हीच बाब 52 संवर्ग आणि 14 नेमणूक अधिकारी/ कार्यालांचे बाबत ठरवावयाची झाल्यास या परीक्षा दीड ते दोन वर्ष चालतील. त्यामुळे 52 संवर्गांच्या परीक्षा 2 शिफ्ट मध्ये घेण्यात येत आहेत. तसा उल्लेखसुद्धा जाहिरातीमध्ये अर्ज भरण्याच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये तसेच वारंवार नोटीफिकेशनमध्ये केलेला आहे. उमेदवारांना सोयीचे व्हावे यासाठी यातील पहिल्या शिफ्टमध्ये 10 ते 12 वी शिक्षण आवश्यक असणारे व दुसऱ्या शिफ्टमध्ये पदवी व त्यावरील शिक्षण आवश्यक असणारे संवर्ग सामाविष्ट केले आहेत.
3) फोटो व सही अस्पष्ट असल्यामुळे अडमीट कार्ड मिळत नाही.
वस्तुस्थिती:
अशा उमेदवरांना न्यासा याना संपर्क साधण्यास कळविले आहे. त्यांना ओळख तपासून प्रवेशपत्रे दिले जाईल.
4) सकाळ व दुपारच्या सत्रासाठी वेगवेगळ्या शहरातील परीक्षा केंद्र दिले आहेत.
वस्तुस्थिती :
सकाळ व दुपारच्या सत्रामधील मधील अर्ज केलेल्या संवर्गाचे नेमणूक अधिकारी/कार्यालय वेगळे असल्यास उमेदवारांना नेमणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालांच्या मुख्यालयानुसार केंद्र दिले आहे. उदा. उमेदवाराने सकाळच्या सत्रासाठी नाशिक मंडळातील संवर्गासाठी अर्ज केला असल्यास त्यास नाशिक मंडळ मिळेल व दुपारच्या सत्रासाठी अकोला मंडळातील संवर्गासाठी अर्ज केला असल्यास त्यास अकोला संवर्ग मिळेल. परंतु, दोन्हीही सत्रांसाठी एकाच नेमणूक अधिकाऱ्याकडे अर्ज केल्यास एकच शहर देण्याचा प्रयत्न केला आहे.
5) काही उमेदवारांनी फीस न भरताही त्यांना प्रवेश पत्र देण्यात आले आहे.
वस्तुस्थिती:
माजी सैनिकांना फीस नसल्यामुळे सुमारे 9000 माजी सैनिकांना फीस न घेता प्रवेश पत्र दिले आहेत
6) नागपूर शहरासाठी जिल्हा अहमदनगर दिला आहे. यासंदर्भातील वस्तुस्थिती खालीलप्रमाणे तक्रारींचे स्वरूप उमेदवारांनी मागितलेल्या परीक्षा केंद्रापेक्षा वेगळे व दूरचे केंद्र देण्यात आले आहे.
वस्तुस्थिती :
अहमदनगर जिल्ह्यामध्ये नागापूर नावाचे गाव आहे. ते परीक्षा केंद्र आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्हा नमूद केला आहे.
आरोग्य विभागामध्ये संवार्गांची संख्या व नेमणूक अधिकारी/कार्यालयांची संख्या खूप जास्त आहे. उमेदवार अर्ज भरताना त्यांना कोणत्या पदामध्ये आवड आहे, याबाबत निश्चित नसतात. ते कोणत्या पदासाठी व कोणत्या कार्यालयात अर्ज केला म्हणजे निवड होण्याची शक्यता जास्त आहे याबाबत अंदाज करत राहतात व त्यामुळे ते अनेक पदांसाठी अर्ज भरतात आणि शेवटपर्यंत कोणत्या पदाची परीक्षा द्यायची हे ठरवत नाहीत. अर्ज करतानाच पर्याय बंद केल्यास उमेदवारांचे नुकसान होईल त्यामुळे आरोग्य विभागाच्या मागील 8 वर्षापासून घेण्यात येत असलेल्या पद भरतीमध्ये उमेदवार कितीही पदासाठी अर्ज करू शकतात. मात्र, ते ज्या पदाच्या परीक्षेसाठी बसतील त्या पदाच्या नेमणुकीसाठी त्यांचा विचार करण्यात येईल अशी पद्धत अवलंबण्यात येते व याबात प्रसिद्धी देण्यात येते. या परीक्षेसाठी जाहिरात, अर्ज भार्तानाच्या मार्गदर्शक सूचना व नोटिफिकेशनद्वारे या बाबी कळविण्यात आल्या आहेत. तरीही उमेदवार अनेक संवर्गासाठी अर्ज करतात व सर्व पदांसाठी परीक्षा देण्याची संधी द्यावी असा आग्रह करतात. 28 फेब्रुवारी रोजी झालेल्या परीक्षेसाठी हीच पद्धत अवलंबण्यात आली होती.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI