MAH CET LLB Result 2022 Declared : स्टेट कॉमन एंट्रेंस टेस्ट सेल, महाराष्ट्र (State Common Entrance Test Cell, Maharashtra) कडून एमएएच सीईटी परीक्षेचे (MAH CET Exam 2022) निकाल जाहीर करण्यात आले आहेत. ज्या उमेदवारांनी महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट 2022 (Maharashtra CET LLB Course Result 2022)  रोजी लॉ कोर्सची पाच वर्ष पूर्ण करुन प्रवेश परीक्षा दिली आहे, असे उमेदवार अधिकृत वेबसाईटवर जाऊन निकाल पाहू शकतात. जर तुम्हीही परीक्षा दिली असेल तर निकाल पाहण्यासाठी mahacet.org या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता. 


कधी झालेली परीक्षा? 


2 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स परीक्षा LLB कोर्सचं आयोजित करण्यात आलं होतं. त्यानंतर 27 ऑगस्ट 2022 रोजी री-एग्जाम घेण्यात आली होती. जे उमेदवार एमएचटी सीईटी परीक्षेला बसले होते. ते खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहू शकतात. 


निकाल पाहण्यासाठी 'या' स्पेप्स फॉलो करा 



  • निकाल पाहण्यासाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाईट mahacet.org ला भेट द्या. 

  • वेबसाईटवर दिलेल्या आयकॉन्सपैकी कोर्सच्या नावावर क्लिक करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा. 

  • त्यानंतर तुमच्यासमोर नवं पेज ओपन होईल. या नव्या पेजवर उमेदवारांना लॉगिन नावाच्या लिंकवर क्लिक करावं लागेल. 

  • तुमच्यासमोर आणखी एक नवं पेज ओपन होईल. तिथे तुम्हाला तुमची माहिती विचारली जाईल. 

  • त्या पेजवर लॉगिन डिटेल्स टाका आणि सबमिट करा. 

  • त्यानंतर रिझल्ट तुमच्या कंम्प्युटर स्क्रिनवर दिसेल. 

  • तुमचा रिझल्ट चेक करा. तसेच, तुम्ही प्रिंट काढून किंवा डाऊनलोड करुन रिझल्ट सेव्ह करु शकता. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI