दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
1.पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, विदर्भात वीजांच्या कडकडाटासह बरसणार, मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाज, कोकण-मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट
2. राष्ट्रीय महामार्गावर खड्डा दाखवा, 3 दिवसात बुजवू, माझाला दिलेल्या मुलाखतीत गडकरींची मोठी घोषणा, इकॉनॉमी मॉडेलमध्ये 6 सीटबेल्टसंदर्भात चर्चा, उडणाऱ्या बसच्या रिपोर्टची प्रतीक्षा
3. सणासुदीच्या सुट्ट्यांनंतर बऱ्याच दिवसांनी आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; नवीन पुनर्वसन धोरणाला मान्यता मिळण्याची शक्यता
Maharashtra Cabinet Meeting: शिंदे फडणवीस सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची (Shinde Fadnavis) आज बैठक होणार आहे. सणासुदीच्या उत्सवात गेल्या काही दिवसात ही मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet News) होऊ शकली नव्हती. अखेर आज ही बैठक सकाळच्या सत्रात पार पडणार आहे. या बैठकीत राज्याच्या नवीन पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे आलेला पूर, जमिनीला भेगा पडणं,भूस्खलन होणं, दरड कोसळणं यासारख्या घटनांमध्ये मदत करण्यासाठी राज्याचं नवीन पुनर्वसन धोरण येणार आहे. गेल्या महिन्यात ऑगस्टमध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. गोविंदांना मदतीच्या निर्णयासह स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस मधून मोफत प्रवासाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.
बैठकीत या निर्णयाला मान्यता मिळण्याची शक्यता
राज्याच्या नवीन पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळण्याची शक्यता आहे. पूर येणे, दरड कोसळणे, चक्रीवादळे, अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक आपत्तींना महाराष्ट्र दरवर्षी तोंड देत असते. अशा नागरिकांच्या पुनर्वसनाचे कोणतेही धोरण नाही. त्यामुळे पुनवर्सन धोरण निश्चित करण्यात आले आहे. यामुळे संभाव्य जिवीतहानी मोठ्या प्रमाणात टाळता येणार आहे. राज्याच्या या नव्या पुनर्वसन धोरणामध्ये नवे निकष आणि नियमातील सुधारणा यांचा समावेश असणार आहे. राज्यात एखाद्या जिल्ह्यात आपत्ती ओढवल्यानंतर देण्यात येणारी मदत वितरीत करण्याचे अधिकार नविन पुनर्वसन धोरणात ठरवण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधितांना मदतीची रक्कम देण्यासाठी लागणार विलंब याचा देखील विचार या नव्या धोरणात केला जाणार आहे. हे धोरण ठरविण्यासाठी समितीची स्थापना केली होती.
4. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर; ठिकठिकाणी सत्कार सोहळ्यांचं आयोजन, सभाही होणार
5. शस्त्राचा गैरवापर केल्याप्रकरणी शिंदे गटाच्या सरवणकरांवर गुन्हा दाखल, ठाकरे-शिंदे गटातील राड्याचा नवा व्हिडीओ माझाच्या हाती, तर नवी मुंबईत शिवसेना-भाजप आमनेसामने
6. राज ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत मनसे पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, महापालिका निवडणुका आणि राज ठाकरेंच्या दौऱ्याबाबत रणनीती ठरणार
7. नाशिकमधील फर्निचरचे व्यापारी शिरीष सोनवणेंच्या मृत्यूचं गूढ वाढलं, मालेगावात आढळलेल्या मृतदेहांवर जखमा, प्रकरणाचा छडा लावण्याचं आव्हान
8. कोकण रेल्वेचा 15 सप्टेंबरपासून सुपरफास्ट प्रवास , पहिल्या टप्प्यात जनशताब्दी, मंगला, तुतारी, तेजस विद्युत इंजिनावर धावणार, ट्रॅक्शन सबस्टेशन पूर्ण क्षमतेनं कार्यान्वीत
9. देशभर गाजलेल्या ज्ञानवापी प्रकरणाचा आज फैसला, प्रार्थनेसाठी परवानगी मिळणार का याकडे देशाचं लक्ष, मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा
10. 8 वर्षांनी ट्वेन्टी20 आशिया चषकाला श्रीलंकेची गवसणी, अंतिम सामन्यात पाकिस्तानचा 23 धावांनी धुव्वा