Maharashtra Board Exam : दहावी (10th Exam) बारावी (12th Exam) बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी. विद्यार्थ्यांचं कोरोना लसीकरण (Corona Vaccination) परीक्षेपूर्वी करण्याचं नियोजन करण्याच्या सूचना शिक्षण संचालनालयानं दिल्या आहेत. मात्र लसीकरण करताना विद्यार्थ्यांना सक्ती न करता पालकांची संमती घेऊनच लसीकरण करण्यात यावं, असे निर्देश विभागानं सर्व विभागीय उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि शाळांना दिले आहेत. बारावीची परीक्षा 4 मार्च तर दहावीची परीक्षा 15 मार्चपासून सुरु होत आहे. तत्पूर्वी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं लसीकरण करण्यात यावं, असा शासनाचा प्रयत्न आहे.


विद्यार्थ्यांचं कोरोना लसीकरण परीक्षेपूर्वी करा अशा सूचना शिक्षण संचालनालयानं दिल्या आहेत. मात्र लसीकरण करताना विद्यार्थ्यांना सक्ती न करता पालकांची संमती घेऊनच लसीकरण करण्यात यावं, असंही सांगण्यात आलं आहे. बारावीची परीक्षा 4 मार्च तर दहावीची परीक्षा 15 मार्च पासून सुरू होत आहे. तत्पूर्वी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात यावं असा शासनाचा प्रयत्न आहे.


पाहा व्हिडीओ : दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षांपूर्वी विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचं नियोजन करा



दहावी, बारावीच्या परीक्षा कशा होणार?


कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावी परीक्षांचा कालावधी आणि स्वरूप निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकार, मंडळामार्फत मुख्याध्यापक, विषय शिक्षक आणि तत्सम तज्ञांशी विचारविनिमय करूनसदर परीक्षांचा कालावधी, स्वरुप निश्चित करण्यात आले आहे. त्यासोबतच परीक्षा सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरणात पार पाडण्याकरिता विद्यार्थ्यासाठी काही विशेष उपाययोजना राबविण्यात येत आहेत. 


परीक्षेचा कालावधी


प्रचलित पद्धतीनुसार, बारावीची परीक्षा 20 फेब्रुवारी दरम्यान आणि दहावीची परीक्षा एक मार्च दरम्यान सुरु करण्यात येते. चालू वर्षी नेहमीपेक्षा सुमारे दोन आठवडे उशिरानं म्हणजेच, पुढील कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत.  बारावीची लेखी परीक्षा चार मार्च 2022 ते 30 मार्च 2022 यादरम्यान होणार आहे. तर श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन 14 फेब्रुवारी 2022 ते 3 मार्च 2022 यादरम्यान होणार आहे. दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च 2022 ते चार एप्रिल 2022 होणार आहे. तर श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन 25 फेब्रुवारी ते 14 मार्च यादरम्यान होणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 




दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा




Education Loan Information:

Calculate Education Loan EMI