मुंबई :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले. बारावीची लेखी परीक्षा  21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2023 या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत होणार आहे. 


महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावी आणि दहावी लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. हे संभाव्य वेळापत्रक बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालय आणि विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने फेब्रुवारी मार्च 2023 च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे


शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे. त्या छापील वेळापत्रकानुसार परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेला प्रविष्ट व्हावे.  अन्य कोणत्याही संकेतस्थळावर किंवा यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हाट्सअप किंवा इतर माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.  


तसेच प्रात्यक्षिक परीक्षा श्रेणी तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत कळविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेचे तयारी करताना योग्य नियोजन करता यावे यासाठी संभाव्य वेळापत्रकाच्या तारखा दिवाळीअगोदर बोर्डाने जाहीर केल्या आहेत


 दहावी बोर्ड परीक्षेचा संभाव्य सविस्तर वेळापत्रक



  • 2 मार्च - प्रथम भाषा ( मराठी, हिंदी उर्दू ,गुजराती व इतर प्रथम भाषा)

  • 3 मार्च - द्वितीय वा तृतीय भाषा 

  • 6 मार्च - इंग्रजी 

  • 9 मार्च - हिंदी ( द्वितीय किंवा तृतीय भाषा)

  • 11 मार्च - संस्कृत, उर्दू ,गुजराती पाली ( द्वितीय किंवा तृतीय भाषा)

  • 13 मार्च - गणित भाग - 1

  • 15 मार्च - गणित भाग 2

  • 17 मार्च - विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1

  • 20 मार्च - विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 

  • 23 मार्च - सामाजिक शास्त्र पेपर 1

  • 25 मार्च - सामाजिक शास्त्र पेपर 2


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI