Ramdas Kadam on Aditya Thackeray : आदित्य ठाकरेला जर जनाची नाही मनाची लाज असती तर योगेश कदमला गद्दार म्हणायची त्याची हिंमत झाली नसती अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली. दापोलीच्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये त्याला एकही एबी फॉर्म दिला नाही. स्थानिक आमदार असताना त्याला उचलून बाजूला ठेवलं. लाज वाटत नाही आदित्यला पाठीत खंजीर खुपसण्याच काम पहिलं त्यांनी केल्याचे रामदास कदम म्हणाले.
काकाच्या पाठीत खंजीर खुपसताना तुला थोडी तरी लाज वाटली नाही का?
आदित्य तूच मला काका काका म्हणतं होतास ना आणि काकाला बाहेर ठेवलस तुझा बाप मुख्यमंत्री झाला. काकाचं पर्यावरण खातं देखील तूच घेतलास. त्यावेळी काकाच्या पाठीत खंजीर खुपसताना तुला थोडी तरी लाज वाटली नाही का? असा सवाल रामदास कदम यांनी केला. बर्फाच्या लादीवर झोपवण्याची भाषा करतोस. तुझी औकात आहे का? बापाला विचार नारायण राणे आणि राज ठाकरे ज्यावेळी बाहेर पडले त्यावेळी गाडीच्या पुढच्या सीटवर मला बसवल्याशिवाय बाहेर पडत नव्हता तुझा बाप असेही रामदास कदम म्हणाले. आधी लग्न करून बघ मग तुला कळेल लादीवर झोपायची मजा काय असते ते असा टोलाही त्यांनी लगावला.
रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सर्व 5 जागा या शिवसेनेच्याच निवडून आल्या होत्या. यंदा पक्षफुटीनंतर चित्र बदलणार का? 2024 विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. यावेळी दापोली मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. योगेश कदम (शिंदे गट) विरुद्ध संजय कदम (उध्दव गट) विरुद्ध संतोष अबगुले (मनसे) अशी लढत होत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळ उडवला आहे. या काळात राजकीय नेते ऐकमेकांवर जहरी टीका करताना दिसत आहेत. तसेच काही नेते वादग्रस्त वक्तव्य देखील करताना दिसत आहे. यामुळं राजकीय वातावरण चांगलच पेटल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. त्यामुळं आता आदित्य ठाकरे त्यांच्या या टीकेला काय उत्तर देणार? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
शिंदेंकडील 8 आमदार 1 मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंचा पलटवार; दिलं चॅलेंज
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI