मुंबई : राज्यात शिक्षकांच्या पात्रतेसाठी घेण्यात येणाऱ्या टीईटी परीक्षेच्या तारखांमध्ये तिसऱ्यांदा बदल करण्यात आला आहे. आता 30 ऑक्टोबर रोजी होणारी टीईटीची परीक्षा 21 नोव्हेंबर रोजी होणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सुधारित वेळापत्रक जाहीर केले. राज्यात 30 ऑक्टोबर 2021 रोजी टीईटी TET म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test) आयोजित करण्यात आली होती. मात्र, त्यादिवशी देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आल्याने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 च्या परीक्षेच्या तारखेत पुन्हा बदल करण्यात आला आहे.


यादी टीईटी परीक्षा 10 ऑक्टोबर रोजी नियोजित होते मात्र त्याच दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा आल्याने टीईटी परीक्षा 31 ऑक्टोबर रोजी घेण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केले. 31 ऑक्टोबरच्या दिवशी या आधीच पुढे ढकललेली आरोग्य विभागाची परीक्षा आल्याने 31 ऑक्टोबर ऐवजी टीईटी परीक्षा 30 ऑक्टोबर रोजी घेण्याचे सुधारित वेळापत्रक जारी करण्यात आले. मात्र, आता देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीमुळे की तारीख पुन्हा बदलून 21 नोव्हेंबर करण्यात आली आहे, त्यामुळे उमेदवारांनी सतत परीक्षेची तारीख बदलत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे


साधारणपणे टीईटी परीक्षेला राज्यातून 3 लाख 30 हजार 642 उमेदवार बसणार आहेत  यासाठी 5 हजार परीक्षा केंद्राचा नियोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केले आहे. राज्यभरात होणारी ही परीक्षा आता 21 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार असल्याचे सुधारीत वेळापत्रक संकेतस्थळावर जारी करण्यात आले आहे. 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI