Kolhapur: कोल्हापूरच्या प्राथमिक शाळेत एक छोटासा, पण भन्नाट प्रयोग सुरू केलाय आणि त्याची प्रेरणा घेतलीय एका मल्याळम चित्रपटातील दृश्यातून! सिनेमात दाखवलं होतं, “पुढच्या बाकावर हुशार, मागच्या बाकावर ढ” हा गैरसमज मिटवण्यासाठी विद्यार्थी गोलाकार बसतात. त्याच कल्पनेवर आधारित, कोल्हापूर जिल्हा परिषदेने “नो मोअर बॅक बेंचर्स” उपक्रम सुरू केलाय. केरळ आणि तमिळनाडूमधील शाळेच्या धर्तीवर हे नवं पाऊल उचललं आहे...पाहुयात एक रिपोर्ट...

Continues below advertisement

नो मोअर बॅक बेंचर्स..चित्रपटाचा संदर्भ 

केरळ आणि तामिळनाडू राज्यांमध्ये आधीच राबविण्यात आलेल्या या पद्धतीचं मूळ एका मल्याळम चित्रपटात आहे. या चित्रपटातील दृश्यात दाखवल्याप्रमाणे वर्गात सर्व विद्यार्थी गोलाकार किंवा यु-आकारात बसतात. यामागील उद्देश असा की, समाजात तयार झालेला "पुढे बसणारा विद्यार्थी हुशार, मागे बसणारा कमकुवत" हा चुकीचा समज दूर व्हावा.

विनेश विश्वनाथ यांना त्यांच्या दिग्दर्शकीय पदार्पण Sthanarthi Sreekuttan इतकी मोठी क्रांती घडवेल, हे अपेक्षित नव्हते. हा मल्याळम चित्रपट थिरुवनंतपुरममधील एका उच्च प्राथमिक शाळेबद्दल आहे. चित्रपटाच्या शेवटी पारंपारिक रांगेत बसण्याची पद्धत सोडून विद्यार्थी अर्धवर्तुळाकार बसतात आणि शिक्षक वर्गाच्या मध्यभागी बसतो. हा सीन पाहून, चित्रपट गेल्या महिन्यात OTT प्लॅटफॉर्म Saina Play वर प्रदर्शित झाल्यानंतर केरळमधील अनेक शाळांनी हि नवीन बैठक व्यवस्था स्वीकारली होती.

Continues below advertisement

कोल्हापूरच्या शाळेने बदलली वर्गरचना 

राज्यात पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्यात या पद्धतीने बैठक व्यवस्था बदलण्यात आली आहे. आता विद्यार्थी यु-आकाराच्या पद्धतीने बसतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी शिक्षकांच्या नजरेत येतो आणि शिक्षकांचं लक्ष प्रत्येकाकडे समान प्रमाणात जातं. शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी सांगितलं की, “मिशन ज्ञानकवच अंतर्गत हा बदल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचं लक्ष अभ्यासाकडे लागावं, त्यांचं व्यक्तिमत्त्व खुलावं, आणि प्रत्येकाला शिकवताना समान वागणूक मिळावी, यासाठी हा प्रयोग राबवला जातो आहे.”

पालकांची समाधानाची भावना

विद्यार्थी इतके खुश झाल्यानंतर पालकांमध्ये देखील समाधान पाहायला मिळतं...प्रामुख्याने पालकांनाच माझा मुलगा मागे बसला, माझ्या मुलग्याला मुद्दाम मागे बसवलं...अशा पद्धतीच्या शंका उपस्थित केल्या जात होत्या... मात्र आता या सगळ्याच निरसन झालं आहे....कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे.... केरळ आणि तामिळनाडू राज्यांनी एका मल्याळम सिनेमांमधून बोध घेऊन बैठक व्यवस्थेमध्ये बदल केला... कोल्हापूर जिल्ह्याने स्वीकारलेला हा बदल संपूर्ण राज्यभर लागू व्हावा अशी अपेक्षा आहे.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI