Robotics Olympics Competition : ‘फर्स्ट ग्लोबल चॅलेंज रोबोटिक्स ऑलिम्पिक’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत (First Global Challenge) भारताचं प्रतिनिधित्त्व मुंबईच्या चाळींमध्ये राहणारी पाच मुलं करणार आहेत. निखत खान, प्रीतम थोपटे, पारस पॉवटे, रोहित साठे आणि सुमित यादव अशी या चौघांची नावं असून हे सर्वजण स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे होणाऱ्या रोबोटिक ऑलिम्पिकमध्ये (Robotics Olympics event in Switzerland) भारताचं प्रतिनिधित्व करतील. 13 ते 16 ऑक्टोबर दरम्यान चालणाऱ्या या स्पर्धेत जगभरातील 180 देशांतील मुले सहभागी होत आहेत. भारताचं प्रतिनिधित्त्व करणारी ही पाचही मुलं आर्थिक परिस्थितीनं गरीब असली तरी टॅलेंटनं श्रीमंत आहेत. विशेष म्हणजे पाचही जण 14 ते 17 वयोगटातील आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत मुंबईतील एका एनजीओने (NGO) एका खासगी कंपनीच्या सहकार्याने या मुलांचे कौशल्य ओळखले आह विकसित करत आहे. सलाम बॉम्बे (एनजीओ) च्या वतीने गौरव अरोरा यांनी यावेळी बोलताना सांगितले की, त्यांच्या एनजीओ सलाम बॉम्बेने इनोव्हेशन स्टोरी या खाजगी कंपनीच्या सहकार्याने मुंबईतील चाळींमध्ये राहणाऱ्या 5 मुलांची टॅलेंट हंटद्वारे निवड केली आणि त्यांना प्रशिक्षण दिले.


पाचही जणांनी मिळून तयार केला 'द्रोण रोबोट'


या पाचही मुलांना रोबोटिक्सशी संबंधित प्रशिक्षणही देण्यात आले आहे. 3 महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर मुलांनी एक रोबोट देखील बनवला असून त्याचे नाव त्यांनी ‘द्रोण’ ठेवले आहे. द्रोण रोबोट अनेक प्रकारची कामे करण्यास सक्षम आहे. ड्रॉना लाँचर सिस्टीम तसेच जायरोस्कोप सारख्या तंत्रज्ञानाने हा रोबोट सुसज्ज आहे. इतकेच नाही तर जमिनीवर वेगाने धावणारा हा रोबो स्वतःला कित्येक फूट उंचीवर नेण्यासही सक्षम आहे.


मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा


मुलांनी मिळवलेले हे यश पाहून पाचवी मुलांच्या पालकांना आनंद झाला आहे. आपल्या मुलांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कुटुंबाचे आणि देशाचे नाव लौकिक मिळवल्यामुळे ते सर्वजण आनंदी आहेत. तसंच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुंबईतून या मुलांची निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त करून शुभेच्छा दिल्या आहेत.


हे देखील वाचा -



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI