Kalyan Dombivali municipal corporation elections 2022 : कल्याण डोंबिवली म्हणजेच केडीएमसी निवडणुकीत ओबीसी आरक्षण गृहीत धरूनच राष्ट्रवादी काँग्रेस  उमेदवारी देणार असल्याचे, राष्ट्रवादीचे माजी आमदार व  जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 


ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटलेला नसताना महापालिका निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. या निवडणुका ओबीसी आरक्षण वगळून होत असल्या तरी येत्या केडीएमसी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट वाटप 27 टक्के ओबीसी आरक्षण गृहीत धरूनच केले जाणार असल्याचे माजी आमदार व कल्याण डोंबवली जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जगन्नाथ शिंदे यांनी निवडणुकीच्या दरम्यान महाराष्ट्राचे ओबीसी आरक्षण नाकारले गेले असून मध्यप्रदेशला मात्र ओबीसी आरक्षण मंजूर करण्यात आले आहे. महाराष्ट्रला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.


राष्ट्रवादी काँगेसच्या वर्धापन दिनानिमित्त आठ ते 16 जून दरम्यान वर्धापन दिन सप्ताह विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा केला जात आहे. या दरम्यान विरोधी पक्षाकडून ओबीसी आरक्षणाबाबत पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत बोलताना आप्पा शिंदे यांनी अप्रत्यक्ष स्वबळाचा नारा दिला. याबाबत बोलताना शिंदे यांनी पक्षपातळीवर महाविकास आघाडी होईल असे संकेत आहेत. मात्र महानगर पातळीवर मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते इच्छुक असतात, अशावेळी आघाडी झाल्यास कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता असल्यानेच पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी करण्यात आली आहे. निवडणुका जवळ आल्यानंतरच आघाडीबाबत योग्य तो  निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.  


दरम्यान, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका पॅनल पद्धतीने पार पडणार आहे. तीन पैकी एक प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव राहिली. याच्या परिणामी अनेक मातब्बरांच्या जागा सुरक्षित राहिल्यात. 


कल्याण-डोबिंवली महापालिकेची लोकसंख्या किती?


> एकूण लोकसंख्या 15 लाख 18 हजार ,762


> अनुसूचित जाती : 1 लाख 50 हजार 171


> अनुसूचित जमाती : 42 हजार 584


 


>> महापालिकेतील जागा


एकूण सदस्य : 133  महिला : 67


अनुसूचित जाती : 13 ,महिला : 07


अनुसूचित जमाती : 04 ,महिला : 02


सर्वसाधारण 116, महिला 58



3 सदस्यांचे 43 प्रभाग सरासरी लोकसंख्या 34,258


4 सदस्यांचा 1 प्रभाग सरासरी लोकसंख्या 45 हजार 677



>> कोणत्या प्रवर्गासाठी कोणत्या जागा आरक्षित


> अनुसूचित जाती प्रवर्गासाठी – 2 अ ,15 अ, 19 अ, 22 अ, 25 अ, 44 अ


> अनुसूचित जाती (महिला) -  4 अ, 6 अ, 7 अ, 17 अ, 20 अ, 23 अ, 43 अ


> अनुसूचित जमाती पुरुष प्रवर्ग -  5 अ, 21 अ


> अनुसूचित जमाती महिला-  6 ब, 19 ब


>> सर्वसाधारण महिला - 1अ, 2ब, 3अ-ब, 4 ब, 5 ब, 7ब, 8ब, 9अ, 10अ-ब, 11 अ-ब, 12अ, 13 अ-ब, 14 अ-ब, 15 ब, 16 अ, 17 ब, 18 अ, 20 ब, 21 ब, 22 ब, 23 ब, 24 अ-ब, 25 ब, 26 अ, 27 अ-ब, 28 अ-ब, 29 अ, 30 अ-ब, 31अ, 32 अ-ब, 33 अ, 34 अ-ब, 35 अ-ब, 36 अ-ब, 37 अ, 38 अ, 39 अ, 40 अ, 41 अ-ब, 42 अ, 43 ब, 44 ब-ड


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI