Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.  बँक ऑफ बडोदा  येथे एकूण 220 जागांसाठी भरती होत आहे. विविध पोस्टविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.


भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, नागपूर


पोस्ट – वेल्डर


एकूण जागा – ७५


शैक्षणिक पात्रता – ITI


वयोमर्यादा – ३५ वर्षांपर्यंत


अर्ज पाठवण्याचा पत्ता - सिनियर डेप्युटी जनरल मॅनेजर (एचआर) भेल, पॉवर सेक्टर वेस्टर्न रिजन, श्री मोहिनी कॉम्प्लेक्स, 345 किंग्सवे, नागपूर – ४४०००१


अर्ज कऱण्याची शेवटची तारीख – १४ फेब्रुवारी २०२२


अधिकृत वेबसाईट - bhel.com


नागपूर नागरीक सहकारी बँक 


पोस्ट - शाखा व्यवस्थापक, अधिकारी, डेटाबेस प्रशासक, नेटवर्किंग अभियंता


एकूण जागा – २९ (यात शाखा व्यवस्थापक पदासाठी १०  जागा, अधिकारी पदासाठी १५ जागा, डेटाबेस प्रशासक पदासाठी ३ जागा, नेटवर्किग अभियंता पदासाठी  १ जागा आहे.)


शैक्षणिक पात्रता – पदवीधर, B.E./ MCA/ B.Sc आणि अनुभवही महत्वाचा आहे.


वयोमर्यादा – शाखा व्यवस्थापक पदासाठी ४५ वर्ष, अधिकारी पदासाठी ४० वर्ष, डेटाबेस प्रशासक पदासाठी ४५ वर्ष, नेटवर्किंग अभियंता पदासाठी ४० वर्ष वयोमर्यादा आहे.


अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – १५ फेब्रुवारी २०२२


अर्ज पाठवण्याचा पत्ता – नागपूर नागरीक सहकारी बँक लि., नागपूर ७९, डॉ. आंबेडकर चौक, सेंट्रल एव्हेन्यू, नागपूर – ४४०००८


अधिकृत वेबसाईट - www.nnsbank.co.in  (या वेबसाईटवर गेल्यावर careers मध्ये तुम्हाला थेट संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


लोक संचलित साधन केंद्र, अकोला


पोस्ट – उपजीविका सल्लागार (livelihood consultant)


एकूण जागा – ९


शैक्षणिक पात्रता - B.Sc Agro/ B.V.Sc & AH/ MSCIT


वयोमर्यादा – ४० वर्षांपर्यंत


अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ फेब्रुवारी २०२२


अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे- बार्शी टाकळी, पातूर, मूर्तिजापूर, अकोट, तेल्हारा याठिकाणच्या व्यवस्थापक, लोक संचलित साधन केंद्र या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.


विवेकानंद एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ लॉ, मुंबई


पोस्ट – प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक


एकूण जागा – ५


अर्ज पाठवण्याचा पत्ता - व्यवस्थापकीय विश्वस्त, विवेकानंद एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ लॉ, सिंधी सोसायटी, चेंबूर, मुंबई – ४०००७१


नोकरीचं ठिकाण – मुंबई


अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ फेब्रुवारी २०२२


अधिकृत वेबसाईट - ves.ac.in


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI