मुंबई : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीअभावी ही संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. जेणेकरुन ज्यांना नोकरीची गरज आहे ते तरुण याठिकाणी अर्ज करु शकतील. तर पाहुयात आज कुठे नोकरीची संधी आहे.

BARC भाभा अणु संशोधन केंद्रात विविध रिक्त पदांची भरती निघाली आहे. एकूण विविध पदांच्या 25 जागांसाठी भरती होते आहे. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया

  • पहिली पोस्ट - पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी –
  1. जागा - 08
  2. शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून एमएस / एमडी / डीएनबी पदवी किंवा डिप्लोमा
  •  दुसरी पोस्ट - कनिष्ठ / वरिष्ठ निवासी डॉक्टर –
  1. जागा - 16
  2. शैक्षणिक पात्रता : एमबीबीएससह मान्यताप्राप्त संस्थेकडून इंटर्नशिप 01 वर्षे
  3. वयाची अट : 40 वर्षापर्यंत
  4. नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
  5. अर्ज पद्धती : ऑफलाईन
  6. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 ऑगस्ट 2021 आहे

अधिकृत संकेतस्थळ : www.barc.gov.in  वर गेलात की करिअर्स हा पर्याय निवडून त्यामध्ये न्यू अपॉर्च्यूनिटीज् हा पर्याय निवडावा. यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता उपलब्ध होईल

  • इंडियन ऑईलच्या 480 प्रशिक्षणार्थी पदांसाठी रिक्त जागांवर भरती
  1.  ट्रेड प्रशिक्षणार्थी/ Trade Apprentice
  2. जागा - 430
  3. शैक्षणिक पात्रता :  10 वी परीक्षा उत्तीर्ण,  संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय
  •  तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी/ Technician Apprentice
  1. जागा - 50
  2. शैक्षणिक पात्रता : किमान 50% गुणांसह संबंधित शाखेत इंजिनिअरिंग डिप्लोमा
  3. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 ऑगस्ट 2021
  4. लेखी परीक्षा : 19 सप्टेंबर, 2021

अधिकृत वेबसाईट - www. iocl.com   वर जाऊन PeopleCareers हा पर्याय निवडलात की तुम्हाला संबंधित जागांविषयची सविस्तर माहिती मिळू शकेल


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI