JEE Mains Session 2 Result 2022 : जेईईच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज जेईई मेन सत्र 2 चा (JEE Mains Session 2) निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. इंजिनिअरींग प्रवेश परीक्षा जेईई मेन परीक्षेत एकूण सहा लाख 29 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आज जेईई मेन सेक्शन 2 चा निकाल जाहीर झाल्यास विद्यार्थी  jeemain.nta.nic.in किंवा nta.ac.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन निकाल पाहू शकतील. जेईई मेन सत्र 2 ची परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात आली होती. विद्यार्थी निकालाची आतूरतेने वाट पाहत आहेत. पण अद्याप निकालाच्या तारखेची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.


जेईई मेनचा निकाल कसा तपासाल? (Check JEE Main Result 2022)


स्टेप 1 :  विद्यार्थ्यांना jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येईल.
स्टेप 2 : वेबसाईटवरील होमपेजवर  Result 2022 या निकालासाठीच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3 : JEE Main Session 2 2022 या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 4 : यानंतर परीक्षार्थीचा क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करावा.
स्टेप 5 : यानंतर तुम्हाला तुमचा निकाल ऑनलाईन पाहता येईल.
स्टेप 6 : विद्याथी निकाल डाउनलोड करु शकतात.
स्टेप 7 : गरजेनुसार विद्यार्थी निकालाची प्रिंटही काढू शकतात.  


जेईई अ‍ॅडवांस नोंदणी (JEE Advanced Registration)


आज जेईई मेन निकाल 2022 जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रविवारी 07 ऑगस्ट 2022 पासून जेईई अ‍ॅडवांस परीक्षेसाठी नोंदणी सुरू होईल. यामध्ये, टॉप रँक असलेल्या उमेदवारांना IIT मध्ये प्रवेश घेण्यासाठी JEE Advanced 2022 परीक्षेसाठी नोंदणी करावी लागेल.


जेईई अ‍ॅडवांस परीक्षेची तारीख (JEE Advanced Exam Date 2022)


जेईई अ‍ॅडवांस परीक्षा रविवारी 28 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात येणार आहे. दोन सत्रांमध्ये होणाऱ्या परीक्षेचा पहिला पेपर सकाळी 09 ते दुपारी 12 वाजेपर्यंत घेण्यात येईल. तर दुसऱ्या सत्राची परीक्षा दुपारी 2.30 ते 5.30 या वेळेत होणार आहे. परीक्षेनंतर 01 सप्टेंबर 2022 रोजी रिस्पॉन्स शीट अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध केली जाईल. Answer Key 03 सप्टेंबर 2022 रोजी जारी केली जाईल. 11 सप्टेंबर 2022 रोजी निकाल जाहीर केला जाईल.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI