JEE Main Session 2 Updates : जेईई मेन परीक्षेच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. JEE Main Session 2 च्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल केले आहेत. NTA ने परीक्षेची सुधारित तारीख आणि वेळापत्रकही जाही केलं आहे. तरी, उमेदवारांनी सुधारित परीक्षेची तारीख जेईईच्या अधिकृत वेबसाईट jeemain.nta.ac.in वर पाहावे असं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. 


जेईई मुख्य सत्र 2 परीक्षेची सिटी स्लिप लवकरच प्रसिद्ध झाली आहे. याशिवाय परीक्षेच्या तारखेतही बदल करण्यात आला आहे. आता JEE मुख्य सत्र 2 ची परीक्षा 4 एप्रिल ते 15 एप्रिल 2024 दरम्यान घेतली जाणार नाही, तर ती 4 एप्रिल ते 12 एप्रिल दरम्यान घेतली जाईल. सिटी स्लिप डाउनलोड करण्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट देऊ शकतात. नवीन तारखेनुसार JEE मुख्य सत्र 2 चे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेऊयात. 


जेईई मेन 2024 परीक्षेचे वेळापत्रक


BE/B.Tech पेपर 1 साठी 4, 5, 6, 8 आणि 9 एप्रिल रोजी नवीन तारखेनुसार JEE मुख्य सत्र आयोजित केले जाईल. तर 12 एप्रिल रोजी बी.आर्क आणि बी.प्लॅनिंगसाठी पेपर 2 होणार आहे. सिटी स्लिप जारी केल्यानंतर, एनटीए आता प्रवेशपत्र देखील जारी करेल. उमेदवार अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जाऊन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील . या परीक्षेसाठी 9 लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. जेईई सत्र 1 मध्ये बसलेले विद्यार्थीही या परीक्षेला बसू शकतात.


JEE मेन सत्र 2 परीक्षेचं Admit Card कसं डाऊनलोड कराल? 



  • परीक्षेचं अॅडमिट कार्ड तुम्हाला डाऊनलोड करायचं असेल तर सर्वात आधी परीक्षेच्या अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic.in वर जा.

  • या ठिकाणी होम पेजवर JEE मेन सेशन 2 Admit Card लिंकवर क्लिक करा.

  • लॉगिन करण्यासाठी येथे आवश्यक माहिती भरा.

  • लॉगिन केल्यानंतर हॉल तिकीट तुमच्यासमोर येईल.

  • आता तुम्ही ते डाऊनलोड करू शकता. 

  • तुम्हाला आवश्यक असल्यास त्याची प्रिंट आऊट देखील तुम्हाला काढता येऊ शकते. 


महत्त्वाच्या बातम्या :


UGC NET June 2024 : तयारीला लागा! UGC NET परीक्षेची अर्जप्रक्रिया लवकरच सुरू होणार, वाचा नवं अपडेट


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI